Let's be determined ...
Let's be determined ... 
कोल्हापूर

बनूया आता कटिबद्धा... 

नंदिनी नरेवाडी ः

कोल्हापूर : युवती - महिलांवरील होणारे अत्याचार थांबावेत यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. अत्याचाराचा निषेध करण्यासाठी कॅंडल मार्च काढले जातात, मात्र समाजातील नेमके चित्र पाहता महिलांवरील होणारे अत्याचार थांबलेले दिसत नाहीत, हे वास्तव आहे. हे अत्याचार रोखायचे असतील महिला, युवतींनीच दामिनी होण्याची गरज आहे. याच आशयावर आधारलेले "स्वयंसिद्धा' संस्थेच्या "सावित्री, दामिनी की कामिनी ?' "बनूया आता कटिबद्धा' या नाटकाला राज्यभरातून प्रतिसाद लाभतो आहे. 

दिल्लीतील निर्भयावर झालेल्या अत्याचारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. ठिकठिकाणी कॅंडल मार्च निघाले. निषेध व्यक्त झाले. मात्र महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना झाली नाही. अत्याचाराचे प्रमाण वाढत गेले. जर महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर स्त्रीला सक्षम करणे गरजेचे आहे. प्रसंगी तिने दामिनी होऊन या अपप्रवृत्तीवर तुटुन पडले पाहिजे. हेच ओळखून येथील स्वयंसिद्धा संस्थेने महिलांच्या प्रबोधनासाठी "सावित्री, दामिनी की कामिनी ?' ही नाटिका बसवली. 

आपली नोकरी, व्यवसाय आणि घर सांभाळत संस्थेच्या हौशी महिला कलाकारांनी यात भुमिका वठवल्या. एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर तिची होणारी मानसिकता, तिच्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन आणि पुरूषांची मानसिकता यावर परखडपणे भाष्य या नाटिकेत केले आहे. स्त्रियांकडे पाहण्याची पुरूषांची दृष्टी बदलायला हवी, हाच संदेश या नाटिकेतून देण्याचा प्रयत्न केला. 2012 ला घडलेल्या या घटनेनंतर रूद्रांश ऍकॅडमीचे दिपक बिडकर यांनी या नाटिकेचे कथानक लिहीले. संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई परूळेकर यांच्या मार्गदर्शनाने हे नाटक आणखी प्रभावी झाले. आतापर्यंत राज्यातील विविध शहरांत या नाटकाचे 34 हून अधिक प्रयोग सादर झाले आहेत. समन्वय स्वयंसिद्धाच्या तृप्ती पुरेकर, सायली पाटील व प्रतिमा गांधी करत आहेत. 

नाटिकेतील कलाकार महिला 
विभा देशपांडे, विनया शिपुरकर, सुजाता धर्माधिकारी, आशा थोरवत, सुस्मिता हिरेमठ, प्रिती बागी, शैलजा सुतार, शितल पाटील, स्वाती तोडकर, सुवर्णा जाधव, कोमल औंधकर, शामल औंधकर, तारा निवेकर, हरिप्रिया दिवेकर, मानसी सावंत. 

दिल्लीतील निर्भयावर झालेल्या अत्याचारानंतर महिलांना सक्षम करण्यासाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले. राज्यभरातील शाळा महाविद्यालयातून 15 हजार युवतींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. त्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी "सावित्री, दामिनी की कामिनी ?' या नाटिकेचे सादरीकरणही केले जाते. 
- तृप्ती पुरेकर, समन्वयिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT