Medical Waste Dumped In Open Space Kowad Kolhapur Marathi News
Medical Waste Dumped In Open Space Kowad Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कोवाडमध्ये वैद्यकीय कचरा उघड्यावर

अशोक पाटील

कोवाड : येथील तळीमाळ टेकडीवर वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला आहे. वारंवार हे प्रकार घडत आहेत. आरोग्य विभागाकडूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. उघड्यावर टाकलेला कचरा धोकादायक असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. स्वच्छ हवेसाठी प्रसिद्ध असलेली तळीमाळ टेकडी आता प्रदूषणाच्या विळख्यात जात असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

गावच्या उत्तरेला तळीमाळ नावाची टेकडी आहे. स्वच्छ हवा व वातावरण चांगले असल्याने माळावर फिरायला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गायरानाची सोय असल्याने जनावरेही चरायला सोडली जातात. भीमदेव मंदिर असल्याने भाविकांचीही ये-जा असते. तेऊरवाडी व दुंडगे गावच्या लोकांना कोवाडला येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने प्रवाशांचीही वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी अगदी उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकला आहे. वाऱ्याने हा कचरा सर्वत्र पसरतो. मुक्‍या जनावरांनाही याचा धोका आहे. 

गेल्या फेब्रुवारीमध्येही प्रकार 
गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्येही असाच मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कचरा या ठिकाणी टाकला होता. प्राथमिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री करून घेतली, पण त्यानंतर त्यावर काहीही हालचाली झाल्या नाहीत. वारंवार हा प्रकार येथे घडतो. माळरानावर हा प्रकार घडत असल्याने जाणीवपूर्वक त्याची कोणीही दखल घेत नाहीत, पण यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामपंचायतीच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT