Monkeys Attack Tractor Drivers In Ajara Taluka Kolhapur Marathi News
Monkeys Attack Tractor Drivers In Ajara Taluka Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

हात्तीवडेत माकडाकडून ट्रॅक्‍टर चालकांवर हल्ला

रणजित कालेकर

आजरा : आजरा तालुक्‍यातील हात्तीवडेत एका माकडामुळे दहशत निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून ट्रॅक्‍टर चालक "लक्ष्य' होत आहेत. माकड ट्रॅक्‍टर चालकांच्या अंगावर उडी मारून त्यांना जखमी करत आहे. त्याच्या हल्ल्यात महिन्यात सहा ट्रॅक्‍टर चालक जखमी झाले. वानराच्या प्रतापाने ग्रामस्थ हैराण झाले असून वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

ट्रॅक्‍टर चालक बाळू चौगुले दोन दिवसांपुर्वी त्याच्या हल्ल्यात जखमी झाले. त्यांनी सांगितलेली हकीकत अशी, ते गावातील रवळनाथ मंदिर परिसरात ट्रॅक्‍टर घेवून गेले होते. त्या वेळी वानराने त्यांच्या अंगावर झेप घेवून मानेचा चावा घेतला. अचानक झालेल्या हल्याने ते घाबरून गेले. त्यांनी आरडाओरड करताच ग्रामस्थ मदतीला धावल्यावर वानर पसार झाले.

यापुर्वीही त्यांने मसणु कुंभार, राजू कुंभार, मुकुंद पाटील, सागर पाटील (होनेवाडी) यासह अन्य ट्रॅक्‍टर चालकांना जखमी केले आहे. गेले चार पाच महीने हा प्रकार सुरु असून अनेक ट्रॅक्‍टर चालक त्याचे लक्ष्य झाले आहेत. गावातील रवळनाथ मंदिराच्या परिसरात ते माकड वावरत असून ट्रॅक्‍टरचा आवाज ऐकताच ते ट्रॅक्‍टर चालकाच्या अंगावर झेप घेवून ओरबाडते व चावते. 

त्याची पळवली टोपी. 
माकडाने एकाचा चांगलाच पाठलाग केला. वानरापासून बचावतांना त्याला पळता भुई थोडी झाली. शेवटी वानराने त्याची टोपी पळवली. 

संपादन - सचिन चराटी 

kolhapur
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT