new 102 corona positive patients in kolhapur
new 102 corona positive patients in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर कोरोना अपडेट; आजही नव्या एवढ्या रूग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर -जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या वाढिचा आलेख चढताच आहे. मंगळवारी रात्री बारा ते बुधवारी रात्री बारा याकालावधीत 545 कोरोना बाधितांची भर पडल्यानंतर आज सायंकाळपर्यंत पुन्हा १०२ कोरोना रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आजवरच्या एकूण बाधितांचा आकडा 12 हजार 657 झाला आहे. 

बाधितांपैकी 74 व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील 14 शासकीय रुग्णालयात एक हजार 243 व्यक्तीचे स्वॅब घेतले आहेत. त्याचे अहवाल दोन दिवसांत मिळणार आहेत. गेल्या वीस दिवसांत बाधितांची संख्या शेकड्याने वाढत असल्याने बेडची संख्या अपुरीच पडत आहे. इचलकरंजी, राधानगरी, गडहिंग्लज, शाहूवाडी येथे खासगी रुग्णालयांतील बेड हाऊस फुल्ल झाले. त्यामुळे अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या अनेकांनी यंत्रणेकडे चौकशी करीत बेड उपलब्ध करण्याविषयी प्रयत्न केले. दुपारपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांच्या जागी नवे रुग्ण दाखल करण्यात आले. 

दरम्यान, काल दिवसभरात 18 बाधितांचे मृत्यू झाले तर 123 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. आजवर एकूण चार हजार 990 व्यक्ती कोरोनामुक्त आहेत. एकूण सात हजार 224 बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. 


एकूण कोरोनाग्रस्त --- 12 हजार 657
एकूण कोरोनामुक्त---- 4 हजार 990 
मृत्यू ------------------- 341 
सध्या उपचार घेणारे ---- 7 हजार 224 

मृत्यूमध्ये पुरुषांची संख्या अधिक 
बाधितांच्या मृत्यूची संख्या काल सलग पाचव्या दिवशीही वाढतच राहिली. गेल्या दोन दिवसांत जवळपास 18 व्यक्तींचा मृत्यू झाला. यात 15 पुरुष तर 3 महिलांचा समावेश आहे. यातही बहुतेकांचे वय 45 ते 75 दरम्यान आहे. मृतांमध्ये बहुतेकांना तीव्र हृदयविकार, मधुमेह, पोटविकार किंवा उच्च रक्तदाब अशी लक्षणे होती, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT