kolhapur municipal corporation sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे नवे निर्बंध

उपाहारगृहे, जिम, चित्रपटगृहे, नाट्यगृहांना ५० टक्के उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : लग्नासाठी हॉलमध्ये शंभर तर खुल्या जागेत २५० व्यक्तींनाच आजपासून परवानगी असेल. यासह सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावरील बंदी आज रात्री नऊपासून सुरू झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी साथरोग अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील अधिकारांस अनुसरून जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी हे अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.(Disaster Management Act 2005)

सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत बंदी.लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर आणि खुल्या जागेत २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल त्यास परवानगी असेल. असे निर्बंध सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठीसुद्धा असतील.क्रीडा स्पर्धा, खेळाच्या समारंभांसाठी आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांची परवानगी. उपाहारगृहे, जिम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहात क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती. या सर्वांना संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे, अशा ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. जिथे आसन क्षमता निश्चित नाही, अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थितीस परवानगी.(25% attendance is allowed in places where seating capacity is not fixed)

खुल्या जागेत आसनक्षमतेच्या २५ टक्केपेक्षा जास्त उपस्थिती नाही.कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या संपूर्ण खुल्या असलेल्या (open to sky) जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (उदा. स्टेडियम इ.) संबंधित मनपा आयुक्त, मुख्याधिकारी किंवा तहसीलदार (ग्रामीण भागात) ही क्षमता निश्चित करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT