Rain outside and no water to drink at home ... 
कोल्हापूर

बाहेर पाऊस आणि घरी प्यायला पाणी नाही... 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : साई प्रसाद तरूण मंडळालगतच्या हरिप्रियानगरच्या अपुऱ्या पाण्याची साडेसाती काही सुटलेली नाही. रात्री बारानंतर तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पावसाळ्यातही रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

राजोपाध्येनगरकडून साई प्रसाद कॉलनीलगत हरिप्रियानगर आहे. काही वर्षापूवी येथे नागरी वस्ती कमी होती. काळाच्या ओघात वस्ती वाढली. सुमारे शंभर ते सव्वाशे घरांच्या पाणीपुरवठ्याचा हा प्रश्‍न आहे. गेल्या वषी आपटेनगर टाकीपासून पाईपलईनची पाहणी झाली. गळती शोधण्याचा प्रयत्न झाला. नंतर काही दिवस पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली. नंतर पूर्वीप्रमाणेच पाण्यासाठी लोकांना जागरण करावे लागते.

रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास पाणी आल्यानंतर ते पहाटे चारपर्यंत सुरू राहते. ज्यावेळी लोक झोपी गेलेले असतात त्यावेळी हरिप्रियानगरवासीयांना जागे राहावे लागते. दूसऱ्या दिवशी पाणी आलेच नाही तर करायचे काय यासाठी जागरण करावे लागते. पाण्याला अपेक्षेप्रमाणे जोर नसल्याने टेरेसवरील टाकीत पाणी जाण्याचा प्रश्‍न येत नाही. 
शहराच्या जुन्या भागात पाणी नको असे म्हणण्याची वेळ येते, तर दूसऱ्या बाजूला उपनगरात मात्र पाण्याची वाट पाहत बसावे लागते. वीजपुरवठा, पाईपलाईनची गळती यामुळे पाणीपुरवठा खंडीत झाल्यास अडचणींना सामोरे जावे लागते. 
पाईपलाईन गळती होती ती काढण्याचा प्रयत्न झाला. आतातरी पाणीपुरवठा सुरळीत होऊन दिलासा मिळेल असे वाटत असताना पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. 

बाहेर पाऊस आणि घरी प्यायला पाणी नाही अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. शहरातील लोक सानेगुरूजी वसाहत परिसरात स्थलांतरित झाले. उपनगर म्हटले की सानेगुरूजी वसाहत लोकांना ठाऊक नसते. नंतर वस्ती वाढत गेली आज मूळ सानेगुरूजी वसहात कोणती आणि वाढीव भाग कोणता हेच ध्यानात नाही.

राजोपाध्येनगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, तुळजा भवानी कॉलनी, साळोखेनगर या परिसरात नागरी वस्ती नव्हती. आज नजर जाईल तिकडे वस्ती आढळून येते. नागरी वस्ती वाढत गेली तसा पाणीपुरवठा, रस्ते, गटारी असा सुविधांवरील ताण वाढत गेला. पाण्याची समस्याही यातूनच निर्माण होत गेली. 

पाणी गळती शोधून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न झाले. पुरेशा दाबाने पाणी नेमके का येत नाही याचा नव्याने शोध घ्यावा लागेल. जास्तीत जास्त मुबलक आणि पुरेशा दाबाने पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न व्हावेत. 
-पृथ्वीराज कांबळे. 


दृष्टिक्षेप 
- राजोपाध्येनगरहून साई प्रसाद कॉलनीलगत हरिप्रियानगर 
- शंभर ते सव्वाशे घरांच्या पाणीपुरवठ्याचा हा प्रश्‍न 
- पाण्यासाठी रात्रभर जागण्याची वेळ 
- जोर नसल्याने टेरेसवरील टाकीत पाणी नाहीच 
- सध्या कमी दाबाने पुरवठा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT