कोल्हापूर

मानोली तपासणी नाक्यावर वाहनांसाठीच वीस रुपये आकारण्याचा निर्णय

CD

01861

आंबा -ः मानोली तपासणी नाक्यावर कर आकारणी संदर्भात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना जी. गुरूप्रसाद. सोबत अन्य मान्यवर.
...

मानोली येथे केवळ वाहनांसाठीच
वीस रुपये आकारण्याचा निर्णय

उपवनसंरक्षकांच्या उपस्थितीत बैठकः प्रवासी कराचा निर्णय रद्द

आंबा, ता. २९ः मानोली हद्दीतील तपासणी नाक्यावर प्रवासी कराऐवजी केवळ वाहनांसाठीच वीस रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्रवासी कराबाबत नागरिकांच्या भावना तीव्र राहिल्यामुळे जी. गुरुप्रसाद यांनी बोलाविलेल्या बैठकीत प्रवासी कर न घेता केवळ वाहनामागे वीस रुपये कर आकारण्याविषयी निर्णय झाला.
दरम्यान, विशाळगडाकडे जाताना वाघझरा व कोकण दर्शन पाँईंट ही दोन्ही ठिकाणे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या व्यक्तींसाठी दहा रुपये व लहान मुलांसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती परिक्षेत्र वन अधिकारी अमित भोसले यांनी दिली.
यावेळी आंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच समता वायकूळ, मानोलीचे सरपंच रामचंद्र पाटील, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील, बाळासाहेब गद्रे, अनिल वायकूळ, महेश विभुते, निलेश कामेरकर, महेंद्र वायकूळ, अमित बेर्डे, किशोर कांबळे, अनिल गवरे, मेहबूब पटेल आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT