farmer
farmer esakal
कोल्हापूर

Kolhapur: हायटेक प्रचाराने वेग! कार्यकर्ते प्रचारात, मतदार राजा शेतात

CD

सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. २६ ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असली तरी ग्रामीण भागात त्याची अद्याप रंगत दिसत नाही. मतदार राजा आपल्या कामात व्यस्त असल्याने उमेदवारांचे कार्यकर्ते गावात येऊन प्रचार करून जातात. मतदार राजा मात्र मशागतीच्या कामात गुंतला आहे. त्यामुळे कार्यकर्ते प्रचारात आणि मतदार राजा शेतात, अशीच स्थिती ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सध्या गावागावांत चर्चा सुरू आहे. उमेदवारांचे दौरे झाले. निवडून आल्यावर हे करू, ते करू, अशी आश्वासने दिली जात आहेत. ‘प्रगतीचा मार्ग धरा, आम्हालाच मतदान करा’ अशा घोषणाही दिल्या जात आहेत. मात्र, हे सर्व आता मतदारांच्या अंगवळणी पडले आहे. सगळेच येतात आणि थापा लावून जातात, असेच मतदारांना वाटते. कोणी निवडून आले तरी आपल्याला काबाडकष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत बळिराजा प्रचाराकडे कानाडोळा करून आपापल्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.

यावेळच्या निवडणुकीत हायटेक प्रचाराने वेग घेतला असून, स्क्रीनवरून उमेदवाराचे कार्य दाखविले जात असून, गावागावांतील चौकाचौकांत प्रचाराच्या गाड्या थांबलेल्या दिसत आहेत. मात्र, या वाहनांकडे कुणी फिरकत नाही किंवा थोडे थांबून उमेदवाराचे कामही पाहत नाही. प्रचारापेक्षा आपले काम महत्त्वाचे असेच ते समजतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT