कोल्हापूर

छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

CD

छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

घुणकी, ता. २३ : येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या २००२-०३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी व शिक्षक तब्बल वीस वर्षांनी स्नेहमेळाव्यानिमित्त आठवणीत रमले. मित्र, मैत्रीणींना पाहून ते भारावून गेलेच पण सामाजिक भान ठेवत ज्या शाळेत शिकले त्या शिवाजी हायस्कूलसह अंबप येथील अवधूत विशेष मुलांची निवासी शाळेसाठी वस्तू रुपात मदत करीत २०२८ ला रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचा निर्धार केला.
गाव सोडून कामानिमित्ताने बाहेर असल्यामुळे गावच्या मित्र, मैत्रिणींची व जन्मभूमीपासून किती लांब असलो तरी आपल्या शाळेची नाळ कधी तुटत नाही. काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन सर्वांशी संपर्क साधला. एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपली आजची ओळख, फनीगेम्ससह, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एक भेट वस्तू आणली होती. ती ड्रॉ पध्दतीने वाटप केली. ती घरी जपून ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेसाठी पाच हजार रुपये अध्यक्ष व वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून अंबप (ता. हातकणंगले) येथील अंबप येथील अवधूत विशेष मुलांची निवासी शाळेत जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. विश्वजीत शिंदे, विनोद उतळे, समाधान जगताप, रवी सुर्वे, अमोल गायकवाड, स्वप्नील बुढ्ढे, दत्ता जाधव, सागर वाडीकर, शितल शेवाळे, मिनाक्षी नांगरे, सोनाली तेली यांच्या पुढाकारातून कार्यक्रम झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT