Raju Shetti vs Eknath Shinde
Raju Shetti vs Eknath Shinde esakal
कोल्हापूर

..अन्यथा मुख्यमंत्र्यांचे कोल्हापुरात काळे झेंडे दाखवून स्वागत करू; राजू शेट्टींचा स्पष्ट इशारा

सकाळ डिजिटल टीम

ज्या साखर कारखान्यांनी (Sugar Factories) ३००० च्या वर दिला आहे, त्यांनी ५० रुपये द्यावेत, असा लेखी प्रस्ताव दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते.

जयसिंगपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ठरल्याप्रमाणे गतवर्षीचे १०० रुपये थकीत बील तातडीने देणे संदर्भात शासनाने पावले उचलावीत अन्यथा मुख्यमंत्र्याचे (Eknath Shinde) कोल्हापुरात शुक्रवारी (ता. १६) काळे झेंडे दाखवून स्वागत करू असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.

ऊस बिलासाठी (Sugarcane Bill) २३ नोव्हेंबर २०२३ ला संघटनेने शिरोली पुलावर चक्का जाम केले. गतवर्षी तुटलेल्या उसाचे थकीत बील १०० रुपये द्यावेत, तसेच ज्या साखर कारखान्यांनी (Sugar Factories) ३००० च्या वर दिला आहे, त्यांनी ५० रुपये द्यावेत, असा लेखी प्रस्ताव दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी करून साखर कारखाने पैसे देतील, असे आश्वासन दिले होते. दोन महिने होत आले तरीही अद्याप अनेकांनी प्रस्ताव दाखल केला नाही. साखर कारखान्यांनी तातडीने दोन दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करू, असा इशारा त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT