कोल्हापूर

चांगली सवयी जीवनशैली बनवून आयुष्य घडवा

CD

83922

चांगल्या सवयीतून आयुष्य घडवा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्षाची सांगता

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत जगात सर्वच क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असणारा महान भारत आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्नातून साकारायचा आहे. असा भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये आहे. तुम्ही विद्यार्थी देशाचे भविष्य आहात. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांच जीवनातच आता ध्येय निश्‍चित करा. ते साध्य करण्यासाठी आळस झटका. नियमित व्यायाम, सकस आहार, चांगले वाचन या जीवनशैली बनवून स्वतःचे आयुष्य घडवा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे केले.
येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभावेळी ते बोलत होते. पेटाळा मैदानातील या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या पत्नी सोनल शहा, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने प्रमुख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील होते.
केंद्रीयमंत्री शहा म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनो कोणताही एक संकल्प करून त्याचे आयुष्यभर पालन करा. सुरुवातील छोटे-छोटे संकल्प करा. त्यातून आत्मविश्‍वास, धाडस वाढून मोठे संकल्प सिद्ध करता येतील. कोणतीही संस्था शतकपूर्ती करते, त्यावेळी तिच्या चालकांनी या संस्थेसाठी जीव ओतून काम केलेले असते. गेल्या शंभर वर्षांत लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणाऱ्या न्यू एज्युकेशन सोसायटीचे पावित्र्य हे एका मंदिरासमान आहे.’
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘शंभर वर्ष अखंडितपणे एखादी संस्था चालविणे सोपे नाही. निस्वार्थी काम, कष्ट, योगदानामुळेच न्यू एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्था घडतात.’
या समारंभात गुणवंत विद्यार्थिनी सिद्धी आवटे (दहावी), काजल कोथळकर (बारावी), गिर्यारोहक कस्तुरी सावेकर, आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील, व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांचा सत्कार केंद्रीय मंत्री शहा आणि सोनल शहा यांच्या हस्ते करण्यात आला. ‘शतसंवत्सरी’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
स्वागताध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी प्रास्ताविकातून संस्थेची वाटचाल मांडली. आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी सोनल शहा यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी संस्थेला पाच लाखांची देणगी दिली आहे. त्यातून दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थिनींसाठी पारितोषिकाची सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष पद्माकर सप्रे, उपाध्यक्ष वसंत पाटील, नियामक मंडळाचे अध्यक्ष निर्मल लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडीकर, नेमचंद संघवी, विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष अनिल लोहिया, सुजाता लोहिया, प्रशांत लोहिया, गायिका पद्मजा फेणाणी, आरती अंकलीकर, संस्थेचे सचिव प्रभाकर हेरवाडे, सहसचिव सूर्यकांत चव्हाण आदी उपस्थित होते. सागर बगाडे, स्नेहा फडणीस, वर्षा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट
वरिष्ठ महाविद्यालयाला मान्यता
स्वागताध्यक्ष लोहिया यांनी संस्कृतचे शिक्षण आणि स. म. लोहिया कनिष्ठ महाविद्यालयाला वरिष्ठ महाविद्यालय करण्याची संस्थेची तयारी असून, त्याला शासनाकडून मान्यता मिळावी, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी वरिष्ठ महाविद्यालयाला विशेष बाब म्हणून मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही दिली.

चौकट
सन्मान केल्याचा अभिमान
माझी पत्नी सोनल यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याठिकाणी आम्हा दोघांचा आज जो सन्मान करण्यात आला. त्याचा मला गर्व, अभिमान असल्याचे केंद्रीयमंत्री शहा यांनी सांगितले. खूप वर्षांनी शाळेत आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मी आयुष्यात जे घडले, त्याचे श्रेय या शाळा, शिक्षकांना असल्याचे सोनल शहा यांनी सांगितले.

चौकट
संस्थेचे कौतुक, विद्यार्थ्यांशी संवाद
‘भारत माता की जय’चा नारा देत आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा शिवसेनेचे नेते असा उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी भाषण सुरू केले. त्यांनी संस्थेचे कौतुक करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT