कोल्हापूर

डी.वाय. ग्रुपतर्फे कार्यक्रम

CD

84139
कोल्हापूर : करारावेळी कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलगुरू डॉ. आर. के. कामत, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. एस. एन. बोऱ्हाडे, डॉ. के. डी. सोनवणे, डॉ. ए. आर. सुपले, डॉ. दादा नाडे.

डी. वाय. पाटील कृषी तंत्र विद्यापीठाचा
भारती विद्यापीठाशी सामंजस्य करार
कोल्हापूर, ता. २० : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय आणि तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीयस्तरावर संशोधन करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले. या करारामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक विनिमय कार्यक्रम, जोड प्रकल्प, प्रगत संशोधन राबविण्यात येणार आहेत.
डॉ. कदम महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेच्या उद्‌घाटन कार्यक्रमात हा सामंजस्य करार झाला. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य डॉ. एस. एन. बोऱ्हाडे, उपप्राचार्य आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. ए. आर. सुपले, अवकाश वैज्ञानिक आणि परिषदेचे समन्वयक डॉ. दादा नाडे, डॉ. संदीप वाटेगावकर, डॉ. राणी पवार, डॉ. के. डी. सोनवणे, प्राचार्य डॉ. एच. एम. कदम, डॉ. संभाजी पवार आदी उपस्थित होते.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन म्हणाले, ‘‘दोन्ही संस्था मिळून भविष्यात संशोधन उपक्रम राबवू.’’ प्राचार्य डॉ. कणसे यांनी कराराद्वारे संयुक्तिरीत्या आंतराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र, कार्यशाळा घेऊ. भविष्यात आंतराष्ट्रीय पातळीवर संशोधन करण्यासाठी दोन्ही संस्था पुढाकार घेतील, असे मत व्यक्त केले. कुलसचिव डॉ. जे. ए. खोत यांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त करीत विद्यार्थी शिक्षक विनिमय, संशोधन शोधनिबंध, प्रस्ताव, चर्चासत्र, कौशल्ययुक्त कोर्सेस संयुक्तरीत्या राबविण्यासाठी कटिबद्ध राहू, असे आश्वासन दिले.
डॉ. एस. एन. बोऱ्हाडे, डॉ. ए. आर. सुपले, अवकाश वैज्ञानिक डॉ. दादा नाडे, डीन डॉ. गुरुनाथ मोटे, डॉ. संदीप वाटेगावकर यांनी परिश्रम घेतले.
प्रा. भारती भावीकट्टी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दादा नाडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT