कोल्हापूर

गडहिंग्लजला महावितरणतर्फे लाईनमन दिन उत्साहात

CD

87002
गडहिंग्लज : महावितरणतर्फे झालेल्या कार्यक्रमात बोलताना विजयकुमार आडके. व्यासपीठावर सागर दांगट.

गडहिंग्लजला महावितरणतर्फे
लाईनमन दिन उत्साहात
गडहिंग्लज, ता. ५ : महावितरणतर्फे लाईनमन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गडहिंग्लज उपविभागातील जनमित्र, यंत्रचालक, बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके अध्यक्षस्थानी होते. महावितरणच्या येथील विभागीय कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
आडके यांनी महापूर, वादळ-वारे अशा नैसर्गिक आपत्तीत, कोरोना काळात वीज कर्मचाऱ्यांनी अखंडित विद्युतपुरवठा ठेऊन ग्राहकांना चांगली सेवा दिल्याचे सांगत त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जनमित्रांना सुरक्षेची शपथ दिली. सहायक अभियंता वाघ यांनी सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता नागेश बसरीकट्टी यांनी जनमित्र कंपनीचा कणा असल्याचे सांगितले. मोहन शेलार, युवराज शेवाळे, रामदास सुतार, सोमनाथ मगर, कुंभार, शिंत्रे या जनमित्रांनी आपले अनुभव कथन केले.
उपकार्यकारी अभियंता सागर दांगट, सहायक अभियंता अजित पवार, राजेंद्र खांडेकर, अनिल सदलगे आदी उपस्थित होते. सहाय्यक अभियंता दत्तात्रय गुरव यांनी सूत्रसंचालन केले. मानव संसाधन विभागाचे उत्तम मिसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT