कोल्हापूर

सोलर वापर

CD

शोध वृत्त
-
उदयसिंग पाटील

मनपाकडून सौर उर्जेचा अत्यल्प वापर
कार्यालये, पथदिव्यांचा विजेपोटी महिन्याला कोटी खर्च; एलईडी दिव्यांमुळे काहीशी बचत

कोल्हापूर, ता. १३ ः पारंपरिक स्त्रोतामधून तयार केली जाणारी वीज वाचवण्यासाठी सौर उर्जेच्या वापरासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. महापालिका मात्र अजूनही पारंपरिक उर्जेवरच अवलंबून असल्याने कार्यालये, पथदिव्यांसाठी दरवर्षी ९३ लाखांवर युनिट विजेचा वापर केला जात आहे. त्यासाठी महिन्याला एक कोटी व वर्षाकाठी सव्वा सात कोटी रुपये खर्च होत आहेत. केवळ पंचगंगा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी मार्केट, आयुक्त बंगला येथे सौर उर्जा वापरली जात असली तरी त्याचा टक्का अत्यल्प आहे. याशिवाय पाणी उपसा पंपांसाठी वर्षाला ४२ कोटी महावितरणला द्यावे लागत आहेत.
महापालिकेने २०१५ मध्ये सौर उर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली. त्यावेळी छत्रपती शिवाजी मार्केट या इमारतीसाठी बॅटरी बॅकअप असलेली सौर यंत्रणा वापरली. त्यानंतर २०१८ मध्ये पंचगंगा हॉस्पिटलसाठी, तर २०२० मध्ये आयुक्त बंगल्यासाठी वापर केला. या दोन्ही यंत्रणा नेट मीटरिंगच्या माध्यमातून राबवल्या. एक हजारच्या आसपास युनिट विजेची बचत केली जात आहे. हे प्रमाण महापालिकेच्या एकूण वीज वापराच्या तुलनेत अत्यल्प आहे. पाणी उपसा पंपांना मोठ्या प्रमाणात वीज लागत असल्याने महापालिकेच्या खर्चातील सर्वाधिक वाटा त्यांचा आहे. त्यापाठोपाठ शहरातील पथदिव्यांवर महापालिका विजेचा खर्च करत आहे. तीन वर्षांपूर्वी एलईडी दिवे बसवल्याने वीज बिलात दीड कोटी रुपयांचा फरक पडला आहे; पण अजूनही सात कोटींवर केवळ पथदिव्यांसाठी खर्च केला जात आहे. तर सर्व कार्यालयांसाठी अडीच ते पावणेतीन लाख युनिट वीज लागते. त्याचे वीस ते पंचवीस लाख रुपयांचे बिल येत आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये प्रशासकीय कामकाजासह पदाधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे या इमारतीचा विजेचा खर्च जास्त आहे. ही इमारत हेरिटेज असल्याने त्यावर सौर यंत्रणा उभी करणे कठीण आहे; पण शेजारील छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीवर त्या इमारतीसह मुख्य इमारतीसाठीची यंत्रणा उभी केली जाऊ शकते. इतर तीन विभागीय कार्यालयांच्या इमारती, वॉर्ड दवाखाने, रुग्णालये, आरोग्य विभागाची कार्यालये, केएमटी अशा विविध ठिकाणी सौर उर्जेची संधी आहे; पण आता छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये असलेली जुनी यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा लावण्याचे प्रस्तावित केले आहे.

चौकट
पथदिव्यांचा वीज वापर (वार्षिक)
वर्ष ः युनिट ः बिल
२०१८-२०१९*१११७५६६०*८२२३९७६०
२०१९-२०२०*१०२११८७२*८१५६५८९०
२०२०-२०२१*९४०५८००*७२११७८४२
२०२१-२०२२*९११४४३२*७१५१२०००.
................
चौकट
पथदिव्यांची संख्या ः ३१२४१.
...........................................
चौकट
महापालिका कार्यालयांचा वीज वापर (वार्षिक)
वर्ष ः युनिट ः बिल
२०१९-२०२०*२६९४२९*२५१९३२०
२०२०-२०२१*२५०४७४*१९३५६००
२०२१-२०२२*२७४८०९*१२६१७००.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT