कोल्हापूर

संवेदना फाउंडेशनतर्फे व्याख्यान, परिसंवाद

CD

88823
आजरा : येथील संवेदना फाउंडेशनतर्फे आयोजित परिसंवादामध्ये ग्रामसेवक मुरलीधर कुंभार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामसेवक वैभव गुरव, गीता पोतदार उपस्थित होते.

संवेदना फाउंडेशनतर्फे
व्याख्यान, परिसंवाद
आजरा, ता. १३ : येथील गंगामाई वाचन मंदिरामध्ये ग्रामविकास व महिला सशक्तीकरण या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान व परिसंवाद झाला. गीता पोतदार अध्यक्षस्थानी होत्या. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ज्योस्ना चराटी प्रमुख उपस्थित होत्या. 
भारती चव्हाण यांनी प्रास्ताविकामध्ये संवेदनाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. एमपीएससीमध्ये राज्यात चौथी आलेली श्रद्धा चव्हाण, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झालेली तेजस्विनी चव्हाण, आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत सुवर्णपदक विजेती सृष्टी रेडेकर यांचा सत्कार झाला. नगरसेविका सुमैय्या खेडेकर यांचाही सत्कार झाला. गिरीश कुंभार यांची उत्तूर जंगलातील वणवा विझवताना मोटारसायकल जळाली होती. त्यांच्या निरपेक्ष कामाची दखल घेऊन संवेदना फाउंडेशनकडून त्यांना पाच हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. सरिता राऊत यांनी व्याख्यानात स्त्रियांचे हक्क, अधिकार, कर्तव्य, जाणीव, स्त्रीशक्तीचे महत्त्व याविषयी माहिती दिली. गीता पोतदार यांनीही मार्गदर्शन केले. ग्रामसेवक वैभव गुरव व मुरली कुंभार यांनी परिसंवादामध्ये ग्रामविकासाबाबत माहिती दिली. धनश्री देसाई, भैरवी सावंत, माधुरी पाचवडेकर, आसावरी मणुनकर, मिलन केसरकर, वर्षा होडगे, किरण चव्हाण, रामकृष्ण मगदूम ‘संवेदना’चे सदस्य उपस्थित होते. महिला सदस्यांना ज्युटची संवेदना बॅग भेट देण्यात आली. डॉ. पल्लवी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. समिधा देशमुख यांनी आभार मानले. समीर चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT