कोल्हापूर

करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकास मंजूरी

CD

ich144.jpg

इचलकरंजी ः मनपा अर्थसंकल्पाची प्रत आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे मुख्य लेखाधिकारी कलावती मिसाळ यांनी सादर केली. यावेळी उपस्थित उपायुक्त प्रदीप ठेंगल, सहाय्यक आयुक्त केतन गुजर, नगरसचिव विजय राजापूरे.
-------------
करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकास मंजूरी
महापालिकेनंतर प्रथमच सदार; ५३९ कोटी ४१ लाख वार्षिक जमाखर्च
इचलकरंजी, ता.१४ ः कोणतीही करवाढ नसलेल्या २०२३-२४ च्या ५३९ कोटी ४१ लाखाच्या वार्षिक जमा- खर्चाच्या अंदाजपत्रकास आज महापालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजुरी दिली. इचलकरंजी महापालिका झाल्यांतर प्रथमच अंदाजपत्रकाची सभा होत असल्यामुळे याकडे विशेष लक्ष होते. कोणतीही फुगवाफुगवी न करता वस्तूनिष्ठ अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती सभेच्या सुरुवातीलाच आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. मुख्य लेखाधिकारी कलावती मिसाळ यांनी आयुक्त देशमुख यांच्याकडे अंदाजपत्रकाची प्रत सादर केली. त्यानंतर आयुक्त देशमुख यांनी अंदाज पत्रकाची सविस्तर मांडणी केली.
----------
उत्पन्नाचे नविन स्त्रोत
अंदाजपत्रकात कोणतेही करवाढ केली नसली तरी महापालिका झाल्यामुळे काही नविन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण झाले आहेत. यामध्ये वृक्ष कर अनामत, भाग नकाशा, झोन दाखला शुल्क, टीडीआर हस्तांतरण शुल्क आदींचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय घरफाळ्यात मलप्रवाह लाभ सुविधा कर (२ टक्के), पाणी पुरवठा लाभ कर (२ टक्के) व पथकर (१ टक्का) वाढ केली आहे. या शिवाय स्वतंत्र विशेष स्वच्छता करमध्ये प्रति स्वच्छतागृह १०० रुपये याप्रमाणे वाढ केली आहे.
-------
नियोजन व संकल्प
* शिवतीर्थ दुसरा टप्पा विकसीत
* १०० टक्के घरफाळा वसुली
* दुधगंगा योजना पूर्ण करणे
* दुकानगाळे ई-लिलावातून उत्पन्न वाढ
* संपादीत जागांची देणी भागवणे
* शहर झोपडपट्टी मुक्त करणे
* कृष्णा योजनेची उर्वरीत जलवाहीनी बदलणे
* नळांना मीटर बसविणे
* कायम स्वरुपी कृत्रिम तलावांची निर्मिती
* महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
* शैक्षणिक कार्यासाठी ३ कोटी
* विविध योजनांचे प्रस्ताव देणे
------------
पाणी योजनांसाठी निधी
दुधगंगा योजनेसाठी ४८ कोटीचा स्वहिस्सा द्यावा लागणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १७ कोटीची निधी राखीव ठेवला आहे. उर्वरीत ३७ कोटीची भविष्यात तरतूद करावी लागणार आहे. कृष्णा योजना सक्षमीकरणासाठी ६ कोटी ३३ लाखांच्या निधीची १५ व्या वित्त आयोगातून तरतूद केली आहे.
-----------
२०२३- २४ चे अंदाजपत्रक
जमा * खर्च
१) प्रारंभी शिल्लक - १८३ कोटी (३३.९६ टक्के) * १) आस्थापना - १२४ कोटी (२३.१४ टक्के)
२) कर महसूल - ३५ कोटी (६.५३) * २) प्रशासकीय - २६ कोटी (४.८५)
३) अभिहस्तांकित महसूल आणि भरपाई - १ कोटी ३५ लाख (०.२५) ३) व्याज व वित्त आकार - ३९ लाख (०.०७)
४) महसूल अनुदाने, अंशदाने, अर्थसहाय्यक - १०५ कोटी (१९.६३) * ४) मालमत्तांची दुरुस्ती व परिरक्षण - १५ कोटी ५२ लाख (२.८८)
५) मनपा मालमत्तेपासून भाड्याचे उत्पन्न - ३ कोटी ९२ लाख (०.७३) * ५) व्यवहार व कार्यक्रम अंमलबजावणी - २४ कोटी (४.४६)
६) फी वापरकर्ता आकार, दंड आकारणी - ९ कोटी ३८ लाख (१.७४) * ६) महसुली अनुदाने, अर्थसहाय्य - १३ कोटी ५० लाख (२.५०)
७) विक्री व भाडे आकार यापासून उत्पन्न - २२ लाख (०.०४) * ७) तरतूदी आणि निर्लेखीत करणे - १ कोटी ५२ लाख (०.२८)
८) व्याजापासूनचे उत्पन्न - ४ कोटी ५० लाख (०.८३) * ८) राखीव निधी व संकिर्ण खर्च - ४९ कोटी ३९ लाख (३८.२९)
९) इतर उत्पन्न - ११ कोटी (२.०६) * ९) स्थीर व जंगम मालमत्ता - २०६ कोटी (३८.२९)
१०) विशिष्ट प्रायोजनाकरीता सर्व अनुदाने - १५८ कोटी (२९.४०) - १० ) कर्ज, अग्रीम, ठेवी - २ कोटी (०.४२)
११) प्राप्त ठेवी - ९ कोटी ९५ लाख (१.८४) * ११) इतर मालमत्ता - ५ कोटी (०.९३)
१२) इतर दायित्व - १६ कोटी (२.९७) * १२) अखेरची शिल्लक - ७० कोटी (१३.०२)
१३) एकूण - ५३९ कोटी ४१ लाख (१००) * १३) एकूण - ५३९ कोटी ४१ लाख (१००)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT