कोल्हापूर

सावंतवाडी

CD

89816

‘व्हेल’ची २५ कोटीची उलटी जप्त
मसुरेत सापळा; दोन मोटारींसह नऊ जण ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी नेणाऱ्या नऊ संशयितांकडून २४ किलो २६४ ग्रॅमच्या व्हेल मासा उलटीसदृश पदार्थाचे तुकडे, दोन चारचाकी, दुचाकी असा सुमारे २५ कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. मसुरे मार्गावरील वेरळ माळरानावर आज दुपारी दोनच्या दरम्यान ही कारवाई केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटी जप्त करण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच कारवाई आहे. नऊ संशयितांना ताब्यात घेतले असी त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. पोलिसांनी या घटेनची माहिती वन विभागाला दिली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि अप्पर पोलिस अधीक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
दरम्यान, यापूर्वी तालुक्यातील तळाशील समुद्र किनाऱ्यावरून एकूण २७ लहान-मोठ्या आकाराचे सुमारे १८ किलो ६०० ग्रॅमचे उलटीसदृश पदार्थाचे तुकडे जप्त केले होते. ही कारवाई १० फेब्रुवारीला पोलिसांनी केली होती. आता पुन्हा तालुक्यातच मोठ्या प्रमाणात उलटीसदृश पदार्थाचे तुकडे जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, उपनिरीक्षक आर. बी. शेळके, सहाय्यक उपनिरीक्षक गुरूनाथ कोयंडे, अनिल धुरी, प्रविण वालावलकर, कृष्णा केसरकर, प्रथमेश गावडे, यश आरमारकर, चंद्रहास नार्वेकर, रवि इंगळे, चंद्रकांत पालकर यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. तालुक्यातील मसदे ते मसुरे मार्गावर व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थ विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. सापळा रचल्यानंतर दोन चारचाकी आणि मोटारसायल आली त्याची तापसणी केली असता मोटार (एमएच ४८ एडब्ल्यू ५४२३) यातून १२ किलो ५२८ ग्रॅमचा उलटी सदृशपदार्थ तर मोटार (एम ०७ एजी ३६१०) यातून ११ किलो ७३६ ग्रॅमचा उलटी सदृश पदार्थ जप्त केला. याबरोबरच मोटारसायकल (एमएच ०७ झेड ६४८८) जप्त केली.
कारवाईत पोलिस निरीक्षक विजय यादव आणि त्यांच्या पथकाने महत्वपूर्ण सहकार्य केले. दुपारी सुरू केलेली कारवाई सायंकाळी सहापर्यंत चालली होती. यापूर्वीही मालवणमध्ये उलटीसदृश पदार्थ सापडून आला होता. सांगली येथून काही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर सिंधुदुर्गचे कनेक्शन समोर आले होते. आता तर जिल्ह्यातील मोठी कारवाई पुन्हा मालवणमध्ये करण्यात येऊन स्थानिकांचा समावेश यात असल्याचे दिसून आले. यामुळे या स्थानिकांच्या सोबत इतर काही सहकारी आहेत काय? उलटी पदार्थ विक्रीचे इतर कनेक्शन आहे काय? या तपास करण्यासाठी संशयीतांची चौकशी करण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले. सर्व नऊही संशयितांवर वन्य जीव संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आज सापडलेला हा पदार्थ ताब्यात घेतल्यानंतर याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

तरंगते सोने
स्पर्म व्हेल प्रजातीतील देवमाशाची उलटी अर्थात अंबरग्रीस अतिशय सुगंधी असते. तिला जगभरात मोठी मागणी आहे. सोन्याच्या भावाने ती विकली जाते. त्यामुळे ‘समुद्रातील तरंगते सोने’ असेही तिला म्हटले जाते. देवगड तालुक्यातील तारामुंबरी, तर मालवणातील देवबाग समुद्र किनारी सापडलेली देवमाशाची उलटी स्थानिक मच्छीमारांनी वन विभागाच्या ताब्यात दिली होती. त्यानंतर जिल्ह्यात अंबरग्रीस तस्करीची प्रकरणेही उघडकीस आली होती.

तळाशील कनेक्शन
दरम्यान, सांगलीत उघडकीस आलेल्या अंबरग्रीस तस्करी प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याचे ‘तळाशील कनेक्शन’ समोर आले होते. त्यानंतर आता तर सर्वात मोठी कारवाई करण्यात येऊन तब्बल २५ कोटीचा पदार्थ जप्त करण्यात आल्याने पोलीस यंत्रणेबरोबरच वन विभागही सखोल चौकशीच्या कामाला लागणार असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT