कोल्हापूर

शिक्षणातील चित्रकला विषय सक्षम करावा

CD

सांस्कृतिक कोल्हापूर

89915
कोल्हापूर : राज्याच्या सांस्कृतिक पुनरावलोकन समितीची दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमध्ये बैठक झाली.

शिक्षणातील चित्रकला
विषय सक्षम करावा
---
सांस्कृतिक पुनरावलोकन समितीपुढे मांडल्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : शालेय शिक्षणातील चित्रकला हा विषय अधिक सक्षम करावा, कलाशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी आदी विषयांचा राज्याच्या सांस्कृतिक धोरणात समावेश व्हावा, अशा सूचना आज चित्रकार, शिल्पकार आणि विविध कला संस्था पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. राज्य शासनातर्फे गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुनरावलोकन समितीतर्फे स्थानिक चित्रकार, शिल्पकार, कला संस्था पदाधिकाऱ्यांची आज दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमध्ये बैठक झाली. त्यात या सूचना आल्या. सांस्कृतिक पुनरावलोकन समितीतर्फे चित्रकार शिल्पकार व कला संस्थांच्या गरजा आणि विविध समस्यांबाबत बैठका घेतल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक झाली. समितीप्रमुख ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, ज्येष्ठ चित्रकार व माजी प्राचार्य जी. एस माजगावकर, सुनील महाडिक, शासकीय प्रतिनिधी डॉ. गणेश तरतरे, प्रा. अर्चना आंबीलढोक, माजी प्राचार्या अस्मिता जगताप आदी या वेळी प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, समितीतर्फे लेखी सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी लेखी सूचनाही दिल्या.
--------------
89907
कोल्हापूर : कलामंदिर महाविद्यालयात पॉटरी प्रात्यक्षिके सादर करताना शुभम कुंभार.

‘कलामंदिर’मध्ये पॉटरी प्रात्यक्षिके
कोल्हापूर, ता. १८ : कुमावत सेवा संघ संचलित कलामंदिर महाविद्यालयतर्फे वार्षिक चित्र-शिल्प प्रदर्शनात आज शुभम कुंभार यांनी पॉटरी प्रात्यक्षिके सादर केली. त्यांनी मातीकामापासून विविध आकाराचे आकर्षक पॉट बनविण्याचे तंत्र शिकविले. कलामंदिर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या कामाचे चित्रप्रदर्शन महाविद्यालयात भरले असून, त्या दरम्यान ही प्रात्यक्षिके सुरू आहेत. प्रा. योगेश मोरे यांनी प्रास्ताविक केले. उद्या (ता. १९) पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार ‘नाबार्ड''चे महाप्रबंधक आशुतोष जाधव व राणोजी चव्हाण यांच्या हस्ते दुपारी चारला होणार आहे.
-------------
‘स्वरझंकार’ मैफल आज रंगणार
कोल्हापूर, ता. १८ : व्हायोलिन ॲकॅडमीतर्फे उद्या (ता. १९) स्वरझंकार ही मैफल संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे. दुपारी साडेचारला ही मैफल होणार असून, विनामूल्य प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध असतील. रोझी दत्ता यांचे गायन, तेजस व राजस उपाध्ये यांचे व्हायोलिनवादन; तर शर्वरी जमेनीस यांचा कथक नृत्याविष्कार होणार आहे. निखिल पाठक (तबला), चिन्मय कोल्हटकर (हार्मोनियम), अतुल कांबळे (तबला), संतोष घंटे (हार्मोनियम) यांची साथसंगत असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

SCROLL FOR NEXT