कोल्हापूर

पोलिस वृत्त एकत्रित

CD

ट्रॅव्हल्‍समधून महिलेचा दोन
लाखांचा ऐवज, रोख रक्कम चोरीस

कोल्हापूर, ता. २० ः ट्रॅव्हल्‍स बसमधून प्रवास करताना महिलेच्या पर्समधील सुमारे दोन लाखांचा ऐवज आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. याबाबतची फिर्याद चेंबूर (मुंबई) येथील दीपिका भास्कर नर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी दीपिका या मूळच्या चेंबूर येथील नवजीवन सोसायटी, कोकणनगर येथील रहिवाशी आहेत. १० मार्चला रात्री बारा ते पहाटे साडेपाच दरम्यान त्यांनी चेंबूर ते कासार्डे असा शर्मा ट्रॅव्‍हल्सने प्रवास केला. या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील दागिने व रोख रक्कम लांबविली. यामध्ये सुमारे दोन लाख ५ हजार ६०० रुपयांचा ऐवज होता. त्यामध्ये ३३.८५० ग्रॅमची सोन्याची चेन, १५.६५० ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, २०.५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट व रोख रक्कम २२ हजार रुपये असा ऐवज होता. त्या कोल्हापुरात उतरल्यामुळे त्यांनी याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.
..............

अंबाबाई मंदिरातून महिलेच्या
पर्समधील ४० हजारांची चोरी

कोल्हापूर, ता. २० ः पुण्यातील महिलेची अंबाबाई मंदिरात मुख दर्शनावेळी चोरट्याने पर्स लांबविली. त्यामध्ये दागिन्यांसह कागदपत्रे असा सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबतची फिर्याद सुमन मधुकर सुतार यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी सांगितले की, १९ मार्चला सकाळी सव्वाअकराच्या सुमारास सुमन सुतार या अंबाबाई मंदिर येथे मुख दर्शनासाठी रांगेत थांबल्या होत्या. यावेळी गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या पर्समधील ४० हजार १८० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. पर्समध्ये रोख रक्कम १५ हजार रुपये, सोन्याचे पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, स्वित्झर्लॅंड देशाचे दोन क्वॉइन(एक क्वॉइन ९० रुपये), लाल रंगाचे एक पाकीट असून, त्यामध्ये पॅनकार्ड, आधार कार्ड व इतर कागदपत्रे होती. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
......


जागेची वाटणी मागितल्यावरून
मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर, ता. २० ः जागेची वाटणी मागितल्यामुळे राजेंद्रनगरात हाणामारी झाली. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली असून, दोघांवर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. इरफान मोहम्मद मोमीन, सोहेल शबरी सनदी (रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, राजेंद्रनगर येथील सौदागर रेशन दुकानाजवळ रविवारी (ता.१९) सकाळी अकराच्या सुमारास जागेची वाटणी मागितल्याच्या कारणावरून संशयित आरोपी इरफान मोहम्मद मोमीन, सोहेल शबरी सनदी (दोघेही रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) यांनी मिळून फिर्यादी शाहिन इम्तियाज मोमीन आणि त्यांच्या पतीस शिवीगाळ करून मारहाण केली. इरफानने फिर्यादी शाहिन यांच्या पतीच्या डोकीत लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केले. याबाबतची फिर्याद दाखल झाल्यावर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT