कोल्हापूर

कचरा प्रक्रिया प्रकल्प

CD

3656
कोल्हापूर : कोल्हापूर सर्वपक्षीय अन्याय निवारण समितीने उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्यासोबत कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत चर्चा केली.

केवळ ३० टक्के कचऱ्यावरच प्रक्रिया
सर्वपक्षीय समितीचा आरोप; पालिका, प्रदूषण मंडळासोबत बैठकीची मागणी
कोल्हापूर, ता. १८ : शहरातून दररोज होणाऱ्या २०० टन कचऱ्यापैकी केवळ ३० टक्क्यावरच प्रक्रिया होत आहे. उर्वरित विनाप्रक्रिया असलेला कचरा पूर्वीच्या कचऱ्यात टाकला जात आहे, असा आरोप करत यातून पर्यावरणाचे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका झाला आहे. त्यामुळे महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ व नागरिकांची सर्वसमावेश बैठक बोलवावी, अशी मागणी कोल्हापूर सर्वपक्षीय अन्याय निवारण समितीने आज केली.
उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्यासोबत समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. या वेळी ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, ‘‘महापालिकेने या प्रकल्पावर कोट्यवधी खर्च केले. पण त्याचा काही फायदा झालेला नाही असे दिसून येते. दररोज जमा होणाऱ्या २०० टन कचऱ्यावर बायोडायजेस्टर व कंपोस्टींगद्वारे प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पण सध्या कंपोस्टींगची सोय नाही. बायोडायजेस्टर फक्त ३० टक्के क्षमतेने काम करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रक्रिया न केलेला कचरा पूर्वीच्या शिल्लक कचऱ्यात टाकला जातो. त्यामुळे बायोमायनिंगसारखा प्रकल्प राबवूनही कचऱ्याचे डोंगर कमी झालेले नाहीत. आग लागू नये म्हणून उन्हाळयात कचऱ्यातून तयार होणारा मिथेन वायू निर्गतीचेही उपाय केलेले नाहीत. बायोमायनिंगसाठी शासनाकडून अनुदान मिळते यासाठीच महापालिका बायोडायजेस्टर, कंपोस्टींग करत नाही.’’ या वेळी दिलीप देसाई यांनीही मत मांडले. शिष्टमंडळात आर. के. पोवार, महादेव पाटील चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, ॲड. सतिश नलवडे, सुवर्णा गिरी, अविनाश दिंडे सहभागी होते. सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT