कोल्हापूर

मान्सून आढावा

CD

03777

पूरस्थितीतील उपाययोजनांची तयारी करा
प्रशासक कादंबरी बलकवडे; महापालिकेची आढावा बैठक

कोल्हापूर, ता. १९ : धोकादायक इमारती उतरवण्याबरोबरच पूरस्थितीत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची तयारी ठेवा, अशा सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या.
मान्सून २०२३ आणि संभाव्य पूरस्थितीबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा शुक्रवारी डॉ. बलकवडे यांनी घेतला. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
प्रशासक बलकवडे म्हणाल्या, ‘धोकादायक इमारती उपशहर अभियंत्यांनी पावसाळ्यापूर्वी उतरवल्या पाहिजेत. पूरस्थितीत कराव्या लागणाऱ्या स्थलांतरितांच्या निवास व्यवस्थेची पाहणी करून तेथील सुविधा तपासून घ्या. स्वच्छता करून ठेवावी. उद्यान अधीक्षकांनी धोकादायक झाडे व फांद्या छाटण्याचे काम पंधरा दिवसात पूर्ण करावे. नाले सफाईची गती आरोग्य विभागाने वाढवावी. यासाठी विभागीय कार्यालयातील नियंत्रण अधिकाऱ्यांनी दैनंदिन फिरती करावी. पुरात पाणी पुरवठ्यासाठी टँकरचे नियोजन करा. अग्निशमन विभागाने त्यांची सामुग्रीची तपासणी करुन ठेवावी. पोहणाऱ्यांची यादी तयार ठेवावी. आरोग्य विभागाने औषधाचा साठा करुन ठेवावा.’
उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आराखडा सादर केला. अग्निशमन विभागाबरोबर महापालिकेची यंत्रणा सज्ज असून, पुढील आठवड्यात प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी निश्चित केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन समिती महापालिका व विभागीय कार्यालय स्तरावर स्थापन केली आहे. वॉर रूमही सुरू करण्यात येणार आहे, असे संगितले.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव, उपशहर अभियंता एन.एस. पाटील, नारायण भोसले, सतिश फप्पे, कनिष्ठ अभियंता मिरा नगीमे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT