कोल्हापूर

अमोल भास्‍कर वर्षासाठी स्थानबद्ध.

CD

03783 - अमोल भास्कर


अमोल भास्करची वर्षभर
येरवडा कारागृहात रवानगी
---
झोपडपट्टी दादा म्हणून स्थानबद्ध; सामाजिक शांततेसाठी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः भास्कर (डॉन) टोळीचा म्होरक्या झोपडपट्टी दादा गुंड अमोल महादेव भास्कर (वय ३९, रा. जवाहरनगर) याला झोपटपट्टी दादा कायद्यांतर्गत (एम.पी.डी.ए.) आजपासून वर्षासाठी पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. शहर पोलिस उपअधीक्षकांनी तयार केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी राहुल रेखावार यांनी काल (ता. १८) मान्यता दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला कणकवली येथे पळून जाताना पकडून येरवडा कारागृहात सादर केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले, की त्याच्याकडून जवाहरनगर, राजारामपुरीसह उपनगरांमध्ये तसेच जिल्ह्यातील बहुतांश भागांतील सार्वजनिक सुव्यवस्थेत वारंवार बाधा आणली जात होती. त्याच्यावर तब्बल १२ हून अधिक गुन्हे आहेत. त्यामुळे ही कारवाई केली. प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून अमोल भास्करविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा अर्थात ‘एमपीडीए’ अंतर्गत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी सादर केला होता. त्याची छाननी करून तो प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी म्हणून रेखावार यांच्याकडे सादर झाला होता. त्यांनी कालच प्रस्तावाला मंजुरी दिल्यावर पोलिसांनी भास्करला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली.
सार्वजनिक ठिकाणी खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी जबर दुखापत पोचविणे, घरात घुसून नुकसान करणे, जबरी चोरी, आदेशाचा भंग, बेकायदेशीर जमाव जमविणे, प्राणघातक हत्यार घेऊन दंगा करणे, धमकी देणे, शिवीगाळ, जमीन बळकावणे, गुन्हा करण्यासाठी कट करणे, बेकायदेशीर खासगी सावकारी, महिलेचा पाठलाग करणे, फोनवरून धमकी देणे, विनयभंग असे गुन्हे भास्करवर दाखल असल्याचे श्री. बलकवडे यांनी सांगितले.
स्थानबद्ध होणार, याची माहिती मिळताच अमोल भास्करने निपाणीमार्गे कणकवली व तेथून पुढे पलायन करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह कणकवली अधिकारी व अंमलदार यांच्याशी समन्वय साधून त्याला काल कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथून ताब्यात घेतले होते.

एमपीडीए म्हणजे काय?
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले तसेच धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी) होय.

फलकावर झळकला... येरवडा कारागृहात पोचला...
अमोल भास्कर हा काही महिन्यांपूर्वी एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शहरातील डिजिटल फलकावर ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून झळकला होता. गुंड असूनही तो ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून मिरवत होता. तेव्हापासून तो पोलिसांच्या नजरेत आला होता. त्याला ‘मोका’ही लावण्यात आला होता. त्यातून तो जामिनावर सुटला होता. त्यामुळे पोलिसांनी आता त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. त्यामुळे एक वर्ष त्याला कारागृहात राहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

SCROLL FOR NEXT