कोल्हापूर

नुतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत

CD

०४७९१

जिल्हा पोलिस अधीक्षकपदी
महेंद्र पंडित यांची नियुक्ती

शैलेश बलकवडे यांची पुणे येथे बदली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुण्यातील राज्य राखीव पोलिस दल येथे समादेशक पदावर बदली झाली. त्यांच्या ठिकाणी नूतन पोलिस अधीक्षक म्हणून महेंद्र कमलाकर पंडित यांची नियुक्ती झाली आहे. गृह विभागाने आज (ता. २४) सायंकाळी हे आदेश प्रसिद्ध केले. पंडित हे बृहन्मुंबई येथे पोलिस उपायुक्त पदावर कार्यरत होते. उद्या (ता. २५) किंवा परवा पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
महेंद्र पंडित हे २०१३ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी झाले आहेत. ते मूळचे सिन्नरचे आहेत. नांदेड येथे त्यांनी उपअधीक्षक पदावर काम केले आहे. २०१७ मध्ये त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली भागात अपर पोलिस अधीक्षक म्हणून दोन वर्षे सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २०१८ मध्ये पोलिस महासंचालनालयाने पुरस्काराने सन्मानित केले आहे. दरम्यान, श्री. बलकवडे हे ३० सप्टेंबर २०२० रोजी कोल्हापुरात अधीक्षक म्हणून रुजू झाले. कालावधी पूर्णतेमुळे त्यांची बदली झाली. गणेशोत्सवात रात्री बारा वाजता साऊंड सिस्टीम बंद करून बलकवडे यांनी पोलिसांचा वचक दाखवून दिला होता. कोणाताही गाजावाजा न करता त्यांनी कागदपत्रांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील टोळक्यांचे रॅकेट मोका आणि ‘एमपीडीए’च्या माध्यमातून मोडीत काढले. कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे कोणतीही मोठी दंगल होऊ दिली नाही. पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्याचाही प्रयत्न केला. गणेश उत्सव काळात पंचगंगा नदीमध्ये त्यांनी एकही मूर्ती विसर्जित करू दिली नाही. त्याला कोल्हापूरकरांनीही मोलाची साथ दिली. त्यांची बदली आता त्यांच्या मूळ गावी पुण्यात झाली आहे.
दरम्यान, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कोट
यापूर्वी कोल्हापुरात कधी काम केलेले नाही. त्यामुळे येथे येऊन माहिती घेतल्यानंतर पुढील कामाची दिशा ठरवणार आहे.
- महेंद्र पंडित, जिल्हा पोलिस अधीक्षक

कोल्हापूरकरांनी भरभरून प्रेम दिले. इथे भाग्य मला मिळाले. पोलिस दलातर्फे राबविण्यात आलेल्या प्रत्येक उपक्रमाला कोल्हापूरवासियांनी नेहमी साथ दिली. कोल्हापूर माझ्या नेहमी स्मरणात राहील.
- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT