कोल्हापूर

सकाळ नाट्य महोत्सव

CD

पडदा आजच्या टुडे १ अँकर बातमीतून
-
पोस्टर ः 07673
-
उद्घाटनाचा मुख्य फोटो व ओळी देत आहे.
-
कॉफी वुईथ सकाळ छोटा फोटो- 07674
........

‘तू तू मी मी’ने उघडला नाट्यमहोत्सवाचा पडदा
कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद, आज रंगणार ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः रसिकांच्या उदंड प्रतिसादातच ‘सकाळ नाट्य महोत्सवा’चा पडदा आज उघडला. ‘तू तू मी मी’ या पहिल्याच नाटकाला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हाऊसफुल्ल गर्दी झाली. चितळे डेअरीचे सरव्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी, तनिष्क ज्वेलर्सचे प्रसाद कामत, माई ह्युंदाईचे चेअरमन मोहन घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्‌घाटन झाले.
दरम्यान, महोत्सवाची मोजकीच तिकिटे शिल्लक असून, रोज सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत नाट्यगृहावर तिकिटे उपलब्ध केली आहेत. रोज रात्री साडेनऊला प्रयोग होणार आहेत.
केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘तू तू मी मी’ या नाटकाचा पहिलाच प्रयोग येथे रंगला. विविध चौदा भूमिका साकारत भरत जाधव यांनी एका रंगतदार प्रयोगाची अनुभूती रसिकांना दिली. चितळे डेअरी महोत्सवाचे मुख्य प्रायोजक, तर सहयोगी प्रायोजक तनिष्क ज्वेलर्स व यशवंत को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड (फलटण), माई ह्युंदाई, दि शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (तळमावले, सातारा) हे आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची तिकिटे ‘बुक माय शो’च्या संकेतस्थळासह फोन बुकिंगवर उपलब्ध आहेत. ९५६१६२६६६५ या क्रमांकावर संपर्क साधूनही तिकिटे आरक्षित करता येतील. काही जागा राखीव आहेत.
दरम्यान, ‘माई ह्युंदाई’च्या वतीने उपस्थित प्रेक्षकांमधून रोज तीन भाग्यवान रसिकांची निवड होणार आहे. त्यातील विजेत्यांना ‘माई ह्युंदाई’कडून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ९) ‘माई ह्युंदाई’च्या शोरूममध्ये होणार आहे.
-------
चौकट
महोत्सवात आज व उद्या...
बुधवार (ता. ७) : एका लग्नाची पुढची गोष्ट
गुरुवार (ता. ८) : नियम व अटी लागू
-----------
चौकट
तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती रुपये)
प्रतिनाटक तिकीट (तळमजला) : ५००
प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) : ४००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT