Ichalkaranji Crime
Ichalkaranji Crime esakal
कोल्हापूर

Ichalkaranji Crime : श्वसननलिकेत फुगा अडकून इचलकरंजीत साडेतीन वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

गौरांश दुपारच्या सुमारास मित्रांसह फुगा फुगवत होता. तो फुगा फुटून श्वसननलिकेमध्ये गेल्याने तो बेशुद्ध पडला.

इचलकरंजी : फुगा (Balloon) फुगवत असताना तो फुटून श्वासनलिकेत अडकून साडेतीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गौरांश अमित लगारे असे बालकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी आयजीएम रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी : लगारे कुटुंब अनेक वर्षांपासून गांधी कॅम्प, इचलकरंजी (Ichalkaranji) येथे वास्तव्यास आहे. मुलाचे वडील अमित लगारे यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. ते तीन महिन्यांपासून काजवे हॉस्पिटल परिसरात राहण्यास आले आहेत. गौरांश दुपारच्या सुमारास मित्रांसह फुगा फुगवत होता. तो फुगा फुटून श्वसननलिकेमध्ये गेल्याने तो बेशुद्ध पडला.

त्याला तातडीने नातेवाइकांनी तेथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले; पण प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी सांगितले. या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT