कोल्हापूर

अतिक्रमण काढण्याचा पोर्ले तर्फ ठाणेत निर्णय

CD

अतिक्रमण काढण्याचा
पोर्ले तर्फ ठाणेत निर्णय
ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
पोर्ले तर्फ ठाणे, ता. २९ : ग्रामदैवत श्री मसाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे अतिक्रमण काढणे, थकबाकी वसुली जोमाने करणे, स्वच्छता अभियान राबवणे यांसह विविध ठराव पोर्ले तर्फ ठाणे ग्रामसभेत करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच अनुराधा शहाजी पाटील होत्या.
ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी अहवाल वाचन केले. सर्व विषय मंजूर करण्यात आले. चर्चेत तानाजी खुडे, सागर साळोखे, केशव घाटगे, अंगद चौगुले, हिंदूराव चेचर, हिंदूराव काशीद आदींनी सहभाग घेतला. या वेळी ग्रामपंचायत दुकानगाळ्यांचे भाडे वाढवणे, पाणीपट्टी वेळेवर न भरणाऱ्यांची नळ जोडणी कट करणे, वेळेत घरफाळा भरणाऱ्यांसाठी विविध बक्षिसांची योजना राबविण्यात आली आहे. त्याचा लकी ड्रॉ ९ जूनला फोडणे आदी ठराव झाले. कृषी पर्यवेक्षक अश्‍विनी नाईक यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
या वेळी उपसरपंच सागर चेचर, सदस्य शहाजी खुडे, अरुण पाटील, संभाजी जमदाडे, महादेव पाटील, अरुण बा. पाटील, जीवन खवरे, सचिन चोपडे, वनिता भोपळे, गीता चौगुले, रजनी गुरव, नाम्रता घाटगे, अश्‍विनी संकपाळ, अश्‍विनी काशीद, संगीता बुचडे, तलाठी गगन देशमुख, तानाजी भोपळे, विकास घाटगे, शहाजी पाटील, नंदकुमार गुरव, युवराज कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष अंगद शेवाळे, पोलिसपाटील बाजीराव इंगळे, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. रामराव चेचर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : गोल्डी ब्रार अन् लॉरेन्स बिस्नोई सिंडिकेटच्या गुन्हेगारी मॉड्यूलच्या विरोधात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT