कोल्हापूर

पेठवडगाव:अंबप फाटा येथे अपघाताचे केंद्र.

CD

02844
अंबप फाटा ःयेथील राष्ट्रीय महामार्गावरील अंबप फाटा येथे वारंवार अपघात होत आहेत.

अंबप फाटा बनला अपघाताचे केंद्र
सहापदरीच्या कामात गयगय, सुविधा नसल्याने वारंवार अपघात

विवेक दिंडे ः सकाळ वृत्तसेवा
पेठवडगाव, ता.२२ : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अंबप फाटा अपघाताचे केंद्र बनला आहे. तीन मोठे व अनेक लहान अपघात येथे झाले आहेत.
सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. सहापदरी महामार्गाचे काम करीत असताना या ठिकाणी अचानक वळण असल्यामुळे व खबरदारीचे उपाय नसल्यामुळे अपघात होत आहेत. पुणे बंगळुरू एक्स्प्रेसवे हा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून जातो.
महामार्गाचे सहापदरीचे काम संथ गतीने सुरू आहे. शिरोली फाटा ते वाठारपर्यंतचा रस्ता करीत असताना अपघात होऊ नये, यासाठीची खबरदारी, सुविधा नाहीत. त्यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे. मंगरायाचीवाडी फाटा व अंबप फाटा येथे अपघात होत आहेत. काही महिन्यांपूर्वी मंगरायाचीवाडी फाटा येथे आराम बस उलटली. या बसखाली मोटार अडकली. मोटारीमधील व बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले.
गेल्या आठवड्यात अंबप फाटा येथे कंटेनर उलटला. दुसऱ्या घटनेत ट्रकचालकास रस्त्याचे वळण लक्षात न आल्यामुळे ट्रक एका मंगल कार्यालयाचे कंपाऊंड तोडून आत घुसला. यात जीवितहानी झालेली नाही. मंगरायाचीवाडी फाटा येथे चढ आहे, तर अंबप फाट्याकडे उतार आहे. यामुळे कोल्हापूरकडून येणारी वाहने वेगाने अंबप फाट्याच्या दिशेने जातात. या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मंगरायाचीवाडी फाटा येथे व अंबप फाटा येथे दोन ठिकाणी रस्त्याला वळण दिलेले आहे. हे वळण देताना अपघात होऊ नये, यासाठी खबरदारी घेतलेली नाही. या जागी गतिरोधक व सूचनाफलक, सुरक्षा भिंत अशा उपाययोजना नसल्यामुळे हानी होत आहे. वाठार, मंगरायचीवाची, अंबपवाडी, मनपाडळे या गावातील नागरिक सातत्याने या मार्गाचा वापर करीत आहेत. हा मार्ग ओलांडताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावे लागतो. यापूर्वी गतिरोधक बसवलेले होते, हे गतिरोधक राष्ट्रपती वारणानगर दौऱ्यावेळी काढले, परंतु त्यानंतर ते गतिरोधक पुन्हा केलेच नाहीत.

--
कोट
महामार्गाच्या कामाच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर ते पाहण्यासाठी स्वतंत्र एजन्सी आहे. या एजन्सीकडून काही चुका झाल्या तर त्यांना सूचना दिल्या. त्यांनी काम न केल्यास दुसऱ्या एजन्सीकडून काम करून घेतले जाईल. लवकरच अपघाताच्या ठिकाणी सूचना फलक व सुविधा उपलब्ध केल्या जातील.
- चंद्रकांत भरडे, उपअभियंता, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण.

अपघाताची मालिका
सहा महिन्यांचा विचार केला तर मंथन हॉटेल येथे एक, भारत पेट्रोलियम, अंबप फाटा या ठिकाणी सात अपघात तर वाठार येथे दोन मोठे अपघात झाले आहेत. या अपघातांची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते तर युक्रेन युद्ध झालंच नसतं, अलास्कात बोलले पुतीन; म्हणाले, शांततेचा तोडगा काढा पण...

Jasprit Bumrah ला टीम इंडियात घेण्यासाठी केलेली शिफारस? इशांत शर्माने सांगितली इनसाईड स्टोरी; म्हणाला,'दुखापत झाली अन्...'

Latest Maharashtra News Updates : मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; रायगडला रेड अलर्टचा इशारा

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT