Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केलंय. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये. मुंबई व उपनगरातही (Mumbai Orange Alert) पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.