wie complaint against husband gandhinagar kolhapur crime news
wie complaint against husband gandhinagar kolhapur crime news 
कोल्हापूर

लग्न झाल्यापासून 15 वर्षे करत होता छळ ; कंटाळून पत्निने दिली फिर्याद 

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर (कोल्हापूर) : चारित्र्याचा संशय घेत, मुल होत नसल्याच्या कारणावरून पत्नीस मारहाण करत खोलीत डांबून ठेवून वारंवार मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या नागेश मलिशा हिरेमठ (मुळ रा. धामोड ता. राधानगरी, सध्या रा. वसगडे ता करवीर जि कोल्हापूर) याच्यावर सोमवारी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.


नागेशची पत्नी कविता हिरेमठ (मूळ रा. धामोड, ता. राधानगरी, जि कोल्हापूर, सध्या रा. द्वारा शंकर शिवलिंग स्वामी, स्वामी गल्ली, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 26 जून 2009 मध्ये लग्न झाल्यापासून पती नागेश हा चारित्र्याचा संशय घेत होता. खोलीत डांबून ठेवून शिवीगाळ करत मारहाण करत होता.

मल्लिकार्जुन न्यासाची केस चालवण्यासाठी विश्वस्ताकडून नागेशने पत्नीमार्फत पाच लाख रुपये घेतले होते. त्याचा स्वतःच उपभोग घेऊन ती रक्कम पतीने परत दिली नाही. याबाबत विचारले असता बेल्ट व बुटाने मारहाण करत छळ करत होता. 2009 मध्ये लग्न झाल्यापासून 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत वेळोवेळी व वारंवार हा छळ सुरू होता. भांडणे, मारहाण करून पत्नीला नागेशने माहेरी पाठवले. अखेर पत्नी कविताने त्रासास कंटाळून फिर्याद दिली. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात नागेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT