solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

गावातल्या महिला बनविणार गुलाबजल, गुलकंद! 

परशुराम कोकणे

सोलापूर : गुलाब फुलांपासून गुलाबजल, सिरप आणि गुलकंद बनविण्याचे प्रशिक्षण देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वस्तिक सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. वडजी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जवळपास 50 कुटुंबांना गुलाबावर आधारित उत्पादने तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. 

उत्तर आणि दक्षिण सोलापूरमधील वडजी, हगलूर, उळे, हिप्परगा येथील शेतकरी गटातील महिलांसाठी सेंद्रिय गुलाबजल, गुलकंद व गुलाब सिरप प्रक्रियेबद्दल प्रशिक्षण शिबिर राबविण्यात आले. यासाठी आशिष कदम, सुदेश गडद, सुमन गायकवाड, प्रशांत गायकवाड, शशांक कदम यांनी परिश्रम घेतले. "आत्मा'च्या माध्यमातून दोन महिलांना गुलाबापासून विविध उत्पादने बनविण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर या महिला गटातील इतर महिलांना मार्गदर्शन करतील. गुलाबापासून बनविण्यात येणारे गुलाबजल, गुलाब सिरप, गुलकंद हे पूर्णत: सेंद्रिय असणार आहे. या उत्पादनाला चांगली मागणी असल्याचे सौ. गडद यांनी सांगितले. 

स्वस्तिक सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित स्वस्तिक गोशाळा व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तळेहिप्परगा येथील स्वस्तिक गोशाळेत कृषी विस्तार माहिती तथा प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन नुकतेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी "आत्मा'चे अधिकारी श्री. बरबडे, स्वस्तिक गोशाळेच्या समन्वयिका सुचित्रा गडद यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन केले. 

गुलाब विक्रीसोबत फुलांपासून विविध सेंद्रिय उत्पादने तयार करण्याबाबत शेतकरी कुटुंबीयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. गुलाबापासून गुलाबजल, गुलाब सिरप, गुलकंद बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
- सुचित्रा गडद, समन्वयक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT