Madha Constituency
Madha Constituency 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : माढ्यात ‘ते’२९ जण बिघडविणार गणित?

रूपेश कदम

दहिवडी - माढा लोकसभा मतदारसंघात विजयश्री खेचून आणण्यासाठी ‘घड्याळ’ व ‘कमळा’त अटीतटीची लढाई सुरू आहे. मात्र, त्याच वेळी खाट, तंबू, चावी, हत्ती व ऊस घेतलेला शेतकरी दोघांचे गणित बिघडविण्यासाठी सज्ज आहेत. माढा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

माढा मतदारसंघात एकूण ३१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. मुख्य लढत ‘राष्ट्रवादी’चे संजय शिंदे यांचे ‘घड्याळ’ व भाजपच्या रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या ‘कमळ’ यांच्यातच आहे. मात्र, हत्ती हे चिन्ह असलेले बसपाचे अप्पा लोकरे, खाट हे चिन्ह असलेले बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाकडून लढणारे वेळापूरचे सुनील ऊर्फ काकासाहेब जाधव, तंबू हे चिन्ह असलेले अपक्ष लढणारे शिरूरचे दौलत शितोळे, चावी हे चिन्ह असलेले वंचित बहुजन आघाडीकडून लढणारे बारामतीचे ॲड. विजय मोरे व ऊस हातात घेतलेला शेतकरी हे चिन्ह असलेले अपक्ष लढणारे पिलीवचे सचिन पडळकर हे उमेदवार प्रबळ दावेदार असलेल्या शिंदे व निंबाळकर यांची गणिते बिघडविण्याची शक्‍यता आहे.

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाच्या हत्तीने १५ हजार ७९० मते घेतली होती. या वेळी बसपा आपली पारंपरिक मते घेण्यात यशस्वी ठरतो, की ती मते ‘वंचित’कडे जाणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

यावर्षी बहुजन मुक्ती पार्टीकडून लढणाऱ्या काकासाहेब जाधव यांनी २०१४ मध्ये अपक्ष लढताना आठ हजार मते घेतलेली होती. मागील पाच वर्षांत त्यांनी मोठ्या प्रमाणात संघटनात्मक काम केले आहे. त्यामुळे या वेळी वाढीव मतांची त्यांना आशा आहे. शितोळे व पडळकर हे अनुक्रमे रामोशी व धनगर समाजाची बऱ्यापैकी मते घेतील, अशी चिन्हे आहेत, तर सध्या सर्व महाराष्ट्रात हवा निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली वंचित बहुजन आघाडी माढ्यातही आपले अस्तित्व दाखविण्यास सज्ज झाली आहे. ‘वंचित’च्या उमेदवाराची भिस्त ही सोशल इंजिनिअरिंगवर आहे. बौद्ध, मागासवर्गीय, धनगर, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाची मते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे ‘वंचित’ला मिळतील अशी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना खात्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT