Satej-patil
Satej-patil 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : राजू शेट्टींनी आणखी दोन दिवस थांबावे

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. सांगलीच्या जागेबाबत येत्या दोन दिवसांत सकारात्मक निर्णय होईल, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहन पाटील यांनी या भेटीत केले.

राज्यात लोकसभेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही समावेश आहे. आघाडीअंतर्गत काँग्रेसला २६; तर राष्ट्रवादी काँग्रेसला २२ जागा मिळाल्या आहेत. यापैकी प्रत्येकी दोन जागा या आघाडीतील घटक पक्षांना त्या त्या पक्षांनी सोडायच्या आहेत.

‘राष्ट्रवादी’ने आपल्या वाट्याची हातकणंगलेची जागा ‘स्वाभिमानी’ला सोडली; पण काँग्रेसच्या वाट्याची जागा अजून ‘स्वाभिमानी’ला मिळालेली नाही. काँग्रेसकडील सांगली लोकसभा मतदारसंघात पक्षातून कोणीच लढायला तयार नाही. त्यामुळे ही जागा ‘स्वाभिमानी’ला सोडण्यात येणार, अशी चर्चा होती. यातून दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातच वाद सुरू झाला. ‘दादा’घरातील लोकांना दुखवून सांगलीची जागा नको, अशी भूमिका शेट्टी यांनी घेतली. दुसरी जागा देणार नसाल तर आघाडीबाबत विचार करू, अशा इशाराही त्यांनी दिला. 

या पार्श्‍वभूमीवर आमदार पाटील यांनी शेट्टी यांची भेट घेतली. या निवडणुकीसाठी पाटील यांची सांगली व सातारा जिल्ह्याच्या निरीक्षकपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांनी यात समझोता घडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला शेट्टी यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला. जयसिंगपूर येथील शेट्टी यांच्या निवासस्थानी झालेल्या या चर्चेवेळी गुलाबराव घोरपडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तौफीक मुल्लाणी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT