Lover
Lover 
पश्चिम महाराष्ट्र

प्रियकराची वाट पाहत तिचा रेल्वे स्थानकावर मुक्काम! 

परशुराम कोकणे

सोलापूर - गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या प्रेमप्रकरणातून प्रियकारासोबत पळून जाण्याच्या तयारीने घराबाहेर पडलेल्या तरुणीने रेल्वे स्थानक गाठले. प्रियकराची वाट पाहिली, मात्र तो आलाच नाही. रात्री रेल्वे स्थानकावर मुक्कामही केला. सकाळी त्याला मोबाईलवर संपर्क साधला मात्र तिचे कुटूंबीय शोध घेत असल्याचे कळाले आणि त्याने धुम ठोकली. याप्रकरणात प्रियकर आणि त्याच्या मित्रावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. 

प्रदीप मनोज मसळीकर, हरी दुध्याल अशी आरोपींची नावे आहेत. शहरात राहणाऱ्या 16 वर्षीय रुपाली नावाच्या तरुणीचे प्रदीपसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. प्रेमसंबंधातून मनोज याने वाढदिवसाच्या दिवशी (ता. 29 जून 2019) प्रेयसी रुपाली हिला सात रस्ता येथील कॉफी शॉपमध्ये नेवून अत्याचार केले. रविवारी (ता. 7 जुलै) दुपारी कपडे वाळू घालण्यासाठी रुपाली घराबाहेर आली आणि प्रियकर प्रदीप यास भेटण्यासाठी रेल्वे स्थानक गाठले. मात्र प्रदीप रेल्वे स्थानकावर गेला नाही. त्याची वाट पाहत तिने रुपालीने रात्री रेल्वे स्थानकावर मुक्काम केला. सोमवारी सकाळी एका व्यक्तीकडून मोबाईल घेवून प्रियकर प्रदीप यास संपर्क केला. त्याने रुपालीला तुळजापूर रस्त्यावर बोलावले. रुपालीच्या कुटूंबीयांकडून शोध सुरु असल्याचे कळाल्याने त्याने तेथून धुम ठोकली. त्यानंतर रुपालीला घेवून तिच्या कुटूंबीयांनी जेलरोड पोलिस ठाणे गाठले. रुपालीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रियकर प्रदीप आणि त्याला मदत करणारा मित्र हरी दुध्याल या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT