Vijay Singh Mohite Patil
Vijay Singh Mohite Patil 
पश्चिम महाराष्ट्र

माढ्याच्या उमेदवारीवर खासदार विजयसिंहांचे मौन

भारत नागणे

पंढरपूर : माढ्यातून खासदार विजयसिंह मोहिते की माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांची चर्चा सुरू असतानाच अचनाक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे आल्याने विजयसिंहांची गोची झाली आहे. पवारांच्या उमेदवारी विषयी विजयसिंह मोहिते यांना आज विचारले असता त्यांनी बोलण्यास स्पष्टपणे नकार देत मौन पाळले. एकूणच त्यांच्या देहबोलीवरून ते नाराज असल्याचे दिसून आले.

माढयाचा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याचा आपला विचार सुरू  असल्याचे काल बारामती मध्ये स्पष्ट केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर माढा मतदार संघातील सर्व राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

माढ्यातून पुन्हा खासदार विजयसिंह मोहिते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मोहितेंना पक्षांतर्गत विरोध असला तरी मतदारातून मात्र त्यांना आजही सहानुभूती आहे. त्यातच माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांनी यांनी यापूर्वीच माढ्याच्या उमेदवारीवर दावा केला आहे. दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू असतानाच अचनाक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव पुढे आले आहे. 2009 साली देखील माढचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती.

आज सांगोला तालुक्यातील वासूद येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी मोहिते यांना शरद पवारांच्या उमेदवारी विषयी विचारले असता त्यांनी या विषयावर स्पष्टपणे बोलण्यास नकार देत मौन बाळगणे पसंत केले. यावेळी त्यांची देहबोली बरेच काही सांगून जाणारी होती. यावेळी त्यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही बोलणे टाळले. उमेदवारी कापली तर मोहिते पाटील कोणती भूमिका घेतात याकडेच लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT