solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

'दिव्यांग' करताहेत आंतरराष्ट्रीय स्मारकाची देखभाल

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या कर्तृत्वामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळालेल्या त्यांच्या भय्या चौकातील स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी दिव्यांग कर्मचाऱ्यांकडे दिली आहे. त्यामुळे महापालिकेची प्रशासकीय यंत्रणेची स्मारकाबाबतची संवेदना किती बोथट आहे हेच स्पष्ट झाले. दिवसा दृष्टिहीन, तर रात्री मूकबधिर कर्मचाऱ्याची नियुक्ती आहे. 

या स्मारकाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी केंद्र शासनासह चीनचे सरकार प्रयत्नशील असताना महापालिका प्रशासनाला त्याचे काहीच देणेघेणे नाही. तक्रार आली की स्मारकाच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण काढण्याचे नाटक करायचे. हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे कमी की काय म्हणून दिव्यांगांची नियुक्ती केली आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत-चीनचे संबंध कसेही असले तरी, आजही डॉ. कोटणीस यांचा संदर्भ देणाऱ्या व्यक्तीचा चीनमध्ये "अतिमहत्त्वाची व्यक्ती' म्हणून पाहुणचार होतो. अशा या व्यक्तीच्या स्मृतिदिनी स्मारकाचा परिसर अस्वच्छ होता. त्याबद्दल येथील कर्मचाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही. दृष्टिहीन कर्मचाऱ्यांना स्वच्छता आणि घाण कुठे हे थोडेच जाणवणार आहे. संवेदना बोथट असली की कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या स्मारकाचीही कशी दुरवस्था होते याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. 

...तर शंभर टक्के होणार फजिती 
स्मारकाच्या देखभालीसाठी रात्रपाळीत मूकबधिर कर्मचारी आहे. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील व्यक्ती रात्रीच्यावेळी अचानकपणे थेट स्मारकाला भेट द्यायला आली तर हा कर्मचारी त्यांच्याशी संवाद कसा साधणार हा प्रश्‍न आहे. त्यामुळे पाहुण्यांची या स्मारकात शंभर टक्के फजिती होणार, हे निश्‍चित आहे. 

या मान्यवरांनी दिल्या भेटी 
- सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती हेमंत गोखले व सौ. गोखले 
- चीन वकिलातीतील अधिकारी ः एच. ई. झुआई, झियॉंग झ्युआन आणि अनुष्का जोशी. 
- माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 

असे आहे स्मारकाचे स्वरूप 
क्षेत्रफळ ः 1040.76 चौरस मीटर 
सुशोभीकरणासाठी खर्च ः अंदाजे 2.35 कोटी 
शासनाने दिलेली मदत ः 1.86 कोटी 
उद्‌घाटन ः 1 जानेवारी 2012 

महापालिकेतील प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी या स्मारकाबाबत उदासीनता दाखवली आहे. फक्त चिनी शिष्टमंडळासमोर कोटणीसप्रेमाचे ढोल वाजवायचे. दिव्यांग कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रशासनाच्या बौद्धिक दिवाळखोरीच आहे. 
- रवींद्र मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT