MLA Anil Benke Esakal
पश्चिम महाराष्ट्र

Belguam: फोन उचलला नाही म्हणून आमदाराच्या कार्यालयावर दगडफेक

उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयावर दगडफेक

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव: आमदारानी फोन उचलला नाही म्हणून रागाच्या भरात मद्यपी तरुणाने उत्तरचे आमदार अनिल बेनके (MLA Anil Benke) यांच्या चव्हाट गल्ली येथील कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड केली. रविवार (ता.१३) रात्री ११.३० सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी मार्केट पोलिसांनी सत्यम ज्योतिबा नाईक (रा.चव्हाट गल्ली) याच्या विरोधात सुमोटो गुन्हा दाखल करून घेतला आहे.

उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांचे चव्हाट गल्ली येथे कार्यालय आहे. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड केली. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती समजताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

आमदारांच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यामध्ये सत्यम ज्योतिबा नाईक या तरुण दगडफेक करताना कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. बंगलोर (Benglore) येथे सुरू असलेल्या अधिवेशना निमित्त आमदार बेळगावात (Belguam) नसल्याने पोलिसांनी या प्रकरणी सुमोटो गुन्हा दाखल करून घेतला. सत्यम हा फरारी झाला असल्याने पोलिसांनी त्याचा शोध चालविला आहे. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांचे सहकारी संशयिताच्या अटकेसाठी प्रयत्न करीत आहेत. आमदारानी फोन उचला नसल्याने रागाच्याभरात दारूच्या नशेमध्ये त्याने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात १७ वर्षांच्या मुलाची हत्या, पोलिसांनी भर पावसात काढली गुन्हेगारांची धिंड; मृताच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारले

IND vs ZIM 1st T20I: भारतीय संघात पदार्पणासाठी ४ युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा; वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आघाडीवर, कशी असेल Playing XI?

Live Updates Marathi : विद्यार्थ्यांसोबत सरकार क्रूरपणे वागले, इंग्रज परवडले : उद्धव ठाकरे

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढले! सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; चांदीही चमकली, पाहा ताजे भाव

जय-शरूमध्ये फुलणार प्रेमाचा बहर, 'सनई चौघडे' मालिकेतील प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'दोघांची केमिस्ट्री...'

SCROLL FOR NEXT