माझा मृतदेह विशालच्या घरी ठेवा,चिठ्ठी लिहून तरूणीची आत्महत्या

विशाल हा विवाहित होता. त्याने तिला लग्नाचे वचन दिले होते.
suicide
suicide sakal media

सुरत: मृत्यूनंतर माझा मृतदेह घरी न देता विशालच्या घरी ठेवा तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल अशी चिठ्ठी लिहून गुजरातमधल्या (Gujarat) ३० वर्षीय तरूणीनं राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत तिच्या वडिलांनी सुरत (Surat) कापोद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या तरूणीचे विशाल पटेल नावच्या तरूणाशी प्रेमसंबंध होते. विशाल हा विवाहित होता. त्याने तिला लग्नाचे वचन दिले होते. तरुणीच्या वडिलांनी विशाल आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

suicide
नो डुलकी, नो अपघात! गुजरातच्या कॉलेज बॉयने बनवला भन्नाट चष्मा

तरूणीने चिठ्ठीत काय लिहले

चार वर्षापूर्वी विशालसोबत माझे प्रेमसंबंध आहेत. त्याने मला लग्नाचे वचन दिले. विशालच्या पत्नीला हे माहित होते. तिला आमच्या प्रेमसंबधा विषयी माहित असूनही तिने आम्हाला साथ दिली. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या कुटुंबाला दु:ख होईल. पण मला त्रास सहन होत नाही. माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह विशालच्या घरी ठेवण्यात यावा असे म्हणून तिने राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com