nivara center.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

तब्बल 36 हजार लोकांना प्रशासनाचा "निवारा' : खेड्यापाड्यांनी दिला आधार

सकाळवृत्तसेवा

सांगली-कोरोना विषाणूच्या रुपाने आलेल्या जागतिक संकटाच्या काळात उपेक्षितांचा आधार होणं, ही प्रशासनाची आणि सांगलीकर म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचे भान राखूनच जिल्ह्यात परप्रांतीय कामगारांसह ऊस तोडणी मजूर, निराधार व्यक्ती, रोजंदारीवरील मजूर, भटके अशा सर्वांची जगण्याची सोय करण्यात आली आहे. तब्बल 36 हजार लोकांना जिल्हा प्रशासनाने "निवारा' दिला असून मोजता येणार नाहीत इतक्‍या लोकांना खेड्यापाड्यांनी आधार दिला आहे. आपल्या ताटातील एक घास या उपेक्षितांच्या मुखात भरवताना माणुसकीचे दर्शन गावोगावी घडते आहे. 


जिल्ह्यातील 97 केंद्रात 36 हजार 220 लोकांची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 12 कम्युनिटी किंचनमध्ये 1 हजार 258 लोकांची सोय होत आहे. महानगरपालिका क्षेत्रात दोन ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु आहे. तेथे 902 लोकांना जेवण दिले जात आहे. निवारागृहातील नागरिकांचा ताण दूर करण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे बैठे खेळ, गाण्यांच्या भेंड्या, संगीत खुर्ची, योगासन, प्राणायन आदी विविध उपक्रम समुपदेशकांमार्फत राबवले जात आहेत. 


जगभरात कोरोना संसर्गाने अक्षरशः थैमान घातले आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. भारतात संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. देशभरात प्रथम 21 दिवसांचा अन्‌ दुसऱ्या टप्प्यात 19 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्राने याची सुरवात आधीपासूनच केली आहे. जिथे आहात तिथेच थांबा, तुमची संपूर्ण काळजी घेण्यात येईल. आपल्यावर आलेले हे संकट फार मोठे आहे, कृपया घरी थांबून सर्वांनी सहकार्य करा. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने करत आहेत. कोरोना संसर्गापासून बचावासाठी घराबाहेर न पडणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. हा काळ सर्वांसाठीच कठीण आहे. या काळात एकमेकांना साथ देणे, हा माणुसकीचा धागा विणला जात आहे. सांगलीकर त्यातही पुढे आहेत. 


साखर कारखाना कॅम्पसमधील 31 हजार 81 ऊसतोड कामगारांचा उपेक्षितांमध्ये समावेश आहे. 85 सामाजिक संस्थांची निवारा केंद्रात खाद्यपदार्थ वितरणासाठी मदत होत आहे. निवारा केंद्रामध्ये आसरा देण्यात आलेल्यांमध्ये हॉटेल कामगार, रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊसतोड मजूर, भटके लोक आहेत. सर्वांना जेवण, औषधे त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत. वैद्यकीय पथकामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. निवारा केंद्रात भरती करताना त्यांना ताप, खोकला, सर्दी अशी काही लक्षणे आहेत का ? याची तपासणी करण्यात आली. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. 


महिला व बालविकाकडून सर्व उपक्रम राबवताना सोशल डिस्टन्सिंगला पाळले जातेय. घरापासून लांब राहून मानसिक खच्चीकरण झालेल्या या श्रमिकांत थोडीशी आनंदाची व उल्हासाची भावना निर्माण करण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. यासाठी फरीदा मुल्ला, स्मिता कुंभार, संभाजी शिंदे, मनाली पवार, प्रियंका पवार, विक्रम इंगवले, तृप्ती पाटील, प्रमोद माने यांची यांची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 3 मे 2020 अखेर सुरु राहीलच. त्यानंतरही आवश्‍यकता असेल तर सांगलीकर मागे हटणार नाहीत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT