Crime
Crime 
पश्चिम महाराष्ट्र

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा आईने केला खून

सकाळवृत्तसेवा

वाई - आई व तिच्या प्रियकराने संगनमत करून अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. गौरव ऊर्फ यश प्रकाश चव्हाण (वय १०) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आई अश्‍विनी प्रकाश चव्हाण (वय २९, रा. वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) व तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय ४१, रा. बावधन, ता. वाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेचीवाडीतील वृंदावन कॉलनीतील इयत्ता चौथीत शिकणारा गौरव ऊर्फ यश चव्हाण हा शुक्रवारी (ता. २८) रात्री गंगापुरी यात्रेतील ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परत आला नाही. त्यामुळे पालकांनी त्याचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी आईने वाई पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास देगावच्या हद्दीत जाधव वस्तीजवळ धोम डाव्या कालव्यात मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही युवकांना आढळला. त्यांनी भुईंज पोलिसांना 
माहिती दिली. 

दरम्यान, गौरव कसा बेपत्ता झाला, याबाबत त्याच्या आईकडे कसून चौकशी केली असता त्यात विसंगती दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी आईला विश्‍वासात घेतले. त्यावेळी तिने सत्य घटना सांगितली. अश्‍विनी व सचिन हे दोघेही औद्योगिक वसाहतीतील कंपनीत नोकरीला होते. तेथे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा खून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. अश्‍विनी ही मुलाला घेऊन कार्यक्रम पाहायला गेली होती. त्यावेळी सचिनचा फोन आल्याने दोघेही दुचाकीवरून शाहीर चौकात आले. त्यावेळी सचिनने मुलाला थंडपेयाची बाटली दिली. ती घेतल्यानंतर तिघेही दुचाकीवरून शेलारवाडी रस्त्याला धोम डाव्या कालव्याजवळ पोचले. दुचाकीवरून उतरल्यानंतर गौरवला गुंगीमुळे चालता येत नव्हते. त्यावेळी मुलाला बाटलीतून काय दिले, असा जाब अश्‍विनीने सचिनला विचारला. त्यावर सचिनने तुला आणि नवऱ्यालाही मारून टाकीन, अशी धमकी देत यशला कालव्यात ढकलून दिले. त्याने आईला हाकही मारली परंतु; अश्‍विनी काहीच करू शकली नाही. दोघांनाही आज अटक करण्यात आली. वाईच्या न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत (ता. १३) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहायक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर तपास करीत आहेत. पोलिस उपअधीक्षक अजित टिके व पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यांनी तपासात मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT