Aundh Music Festival
Aundh Music Festival 
पश्चिम महाराष्ट्र

औंधला शनिवारी संगीत महोत्सव

सकाळ वृत्तसेवा

औंध : औंध संगीत महोत्सव येत्या शनिवारी (ता. 19) आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे सचिव पंडित अरुण कशाळकर यांनी दिली. या वेळी प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार उपस्थित होते. औंध संगीत महोत्सवाचे यंदाचे 79 वे वर्ष आहे.
 
ग्रामीण भागात शास्त्रीय संगीत रुजावे व त्याचे महत्त्व वाढावे. चांगले गायक, वादक निर्माण व्हावेत, यासाठी ग्वाल्हेर घराण्याचे बुजूर्ग गायक आणि गुरू गायनाचार्य पंडित अनंत मनोहर जोशी व त्यांचे पुत्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिन वादक व गायक पंडित गजाननबुवा जोशी यांनी आध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1940 पासून हा महोत्सव सुरू केला.
 
या संगीत महोत्सवात ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा, हिराबाई बडोदेकर, पंडित भीमसेन जोशी, शिवरामबुवा वझे आदी गायक, नामवंत वादकांनी उपस्थिती लावली आहे. आज या संगीत महोत्सवाने व्यापक स्वरूप प्राप्त केले आहे.
 
यंदा शनिवारी तीन सत्रांमध्ये हा संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी साडेनऊ वाजता माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते संगीत महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. या वेळी औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
पहिल्या सत्राची सुरवात अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांच्या सहगायनाने होणार आहे. त्यानंतर फारुख लतीफ यांचे सारंगीवादन होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. अलका देव मारूलकर यांच्या गायनाने प्रथम सत्राची सांगता होणार आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पहिले सत्र होणार आहे.
 
दुपारी चार ते रात्री नऊ यावेळेत दुसरे सत्र पार पडणार आहे. या सत्रामध्ये पंडिता शुभदा पराडकर, पंडित अरुण कशाळकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे, तसेच रात्री आठ वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते रियाज स्मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. याप्रसंगी ललिता कला केंद्र, पुणे विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण भोळे, रामभाऊ पवार, सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले अमिरा पाटणकर यांचे कथ्थक नृत्य होणार आहे.
 
रात्रीचे शेवटचे तिसरे सत्र दहा वाजता सुरू होणार आहे. या सत्रामध्ये पंडित व्यंकटेश कुमार, अनुराधा कुबेर, पंडित दिनकरबुवा पणशीकर यांचे गायन होणार आहे, तसेच पांडुरंग पवार यांचा तबला सोलो, पंडित रुपक कुलकर्णी यांचे बासरी वादन होणार आहे. या वेळी तबला संगत प्रवीण करकरे, पंडित अरविंद कुमार आझाद, स्वप्नील भिसे, हार्मोनिअम संगत प्रवीण कासलीकर, सिद्धेश बिचोलकर करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT