बेळगाव : एपीएमसीत कांदा दर ४०० ने गडगडला
बेळगाव : एपीएमसीत कांदा दर ४०० ने गडगडला sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : एपीएमसीत कांदा दर ४०० ने गडगडला

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) बुधवारी (ता. २०) बाजाराच्या दिवशी गेल्या बाजाराच्या तुलनेत जुना कांदा दर ४०० रुपयांनी कमी झाला. एपीएमसीत सुमारे ११५ गाड्या कांदे दाखल झाले असून महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल २५०० ते ३८०० रुपये दर होता. तर कर्नाटकातील नव्या कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते २८०० रुपये दर होता.

एपीएमसीत बुधवारी कांदा आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. महाराष्ट्रातील जुना कांद्याच्या २५ गाड्या दाखल झाल्या होत्या. यामध्ये बारीक कांदा प्रतिक्विंटल २५०० रुपये, मध्यम कांदा ३ हजार ते ३५०० रुपये त मोठा कांदा ३५०० ते ३८०० रुपये तसेच कर्नाटकातील नवीन कांद्याच्या ९० गाड्या दाखल झाल्या होत्या. यामध्ये बारीक कांदा प्रतिक्विंटल १ हजार ते १५०० रुपये, मध्यम १५०० ते २५०० रुपये तर मोठा कांदा २५०० ते २८०० रुपये दर होता. बुधवारी दिल्ली, उत्तरप्रदेश व कलकत्ता येथील ग्राहक आले होते.

याचबरोबर इंदूर, आग्रा व स्थानिक बटाट्याचीही आवक होती. इंदूर बटाट्याच्या ३ गाडया आल्या होत्या. या बटाट्याला प्रतिक्विंटल १८०० रुपये दर होता. तर आग्रा बटाट्याच्या ४ चार गाड्या होत्या. प्रतिक्विंटल १७०० रुपये दर होता. स्थानिक बटाट्याच्या सुमारे १० हजार पिशव्या आल्या होत्या. या बटाट्याला प्रतिक्विंटल १५०० ते २ हजार रुपये दर होता. गेल्या बाजाराच्या तुलनेत स्थानीक बटाट्याचा १०० ते २०० रुपये दर कमी झाला. तसेच बाजारात रताळ्यांच्या सुमारे १० हजार पिशव्या दाखल झाल्या होत्या. गेल्या बाजाराच्या तुलनेत दर टिकून होता. प्रतिक्विंटल १ हजार ते १३०० रुपये दर मिळाला.

बुधवारी एपीएमसीत कांद्याच्या सुमारे ११५ गाड्यांची आवक होती. मागील बाजाराच्या तुलनेत जुन्या कांद्याच्या दरात ४०० रुपयांनी घट झाली. बटाटा व रताळ्यांचीही चांगली आवक होती.

-महेश कुगजी, व्यापारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PN Patil Death: झुंज अपयशी! करवीरचे आमदार पी.एन पाटील यांचे निधन

Buddha Purnima 2024 : गौतम बुद्ध कोण होते? त्यांना बुद्ध नाव कसे पडले? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - 23 मे 2024

Prashant Kishore: आवाज कमी करा... 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर संतापले, व्हायरल व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं?

Sakal Podcast : पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी ते कोहली IPL मध्येही किंग!

SCROLL FOR NEXT