Infectious Disease
Infectious Disease esakal
पश्चिम महाराष्ट्र

Infectious Disease : रात्री थंडी अन् दिवसा उन्हाचा चटका; संसर्गजन्य आजारांचे वाढले रुग्ण, खबरदारी घेण्याची गरज

सकाळ डिजिटल टीम

रात्री व सकाळी थंडी आणि दिवसभर उन्हाचा कडाका अशा विचित्र वातावरणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

नवेखेड : गेल्या काही दिवसांपासून दिवसा पडणारे कडक ऊन व सकाळी, तसेच रात्रीची थंडी यामुळे सर्दी, खोकल्यासह (Cold, Cough) संसर्गजन्य आजारांचे (Infectious Disease) रुग्ण वाढले आहेत. वातावरणातील हा बदल काही दिवस असाच राहील, असा अंदाज हवामान विभागाने (Meteorology Department) वर्तविला असून दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

फेब्रुवारीअखेरपासून उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. येणारा उन्हाळा कसा असेल, याची ही झलक आहे. असे असले तरी रात्री व सकाळी थंडीचा कडाका मात्र चांगलाच जाणवत अगदी हुडहुडी भरेल, अशी आहे. त्यामुळे रात्री व सकाळी थंडी आणि दिवसभर उन्हाचा कडाका अशा विचित्र वातावरणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

आरोग्य विभागाच्या सूचना

  1. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपीचा वापर करा

  2. दुपारी बारा ते तीनदरम्यान घराबाहेर जाणे टाळा

  3. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा.

  4. उन्हात काम करताना टोपी, छत्री, ओल्या

  5. कपड्याने डोके, मान, चेहरा झाका

  6. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास

  7. ओआरएस, घरी बनवलेली लस्सी, कैरीचे पन्हे,

  8. लिंबू पाणी, ताकाचा वापर नियमित करा.

  • ..ही दक्षता घ्या

  • अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे

  • ओळखा व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • जनावरांना सावलीत बांधा. त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्या.

  • घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करा. खिडक्या उघड्या ठेवा.

  • पंखे, ओले कपडे यांचा वापर करा. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करा.

  • कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा.

  • सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी प्रयत्न करा

  • पहाटे जास्त कामाचा निपटारा करा

  • गर्भवती स्त्रिया आणि आजारी कामगारांची काळजी घ्या

ऊन वाढल्याने वातावरणात समतोल नाही. सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून हा खोकला पंधरा दिवस जात नसल्याने यातून न्यूमोनियाचा आजार बळावतो. त्यामुळे आरोग्याची त्वरित दक्षता घेतली की, संसर्गजन्य आजार टाळता येऊ शकतात.

-डॉ. संदीप कोडग, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, चिकुर्डे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT