paan
paan 
पश्चिम महाराष्ट्र

कलकत्ता पान यईचना... विडा काही रंगेचना 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः काहीजणांना वाटतं फक्त दारू पिणं हेच व्यसन असतं... ते अर्ध सत्य आहे. अनेकांना पान खाण्याचेही व्यसन असते. त्यातही ब्रॅंड ठरलेला असतो. दुपारी जेवनानंतर, रात्री शतपावली करताना तोंडात पानाचा विडा लागतोच लागतो.

एरवी बाहेर जेवनाचा बेत असेल तर त्यानंतर पान टपरीवर घडीभर विश्रांती घेतली जातेच, पण हे सारे दोन महिन्यांपासून बंद होते. कोरोना संकटात लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक व्यसनांना पायबंद घातला गेला, आता पुन्हा एकदा पानपट्ट्या सुरु झाल्या आहेत, मात्र एक अडचण झालीय राव ! पानपट्ट्यांत पानच मिळेना झालेय, त्यातही कलकत्ता आणि बनारस पानांचा तुटवडा आहे. त्यामुळे विडा रंगेना, अशी अवस्था आहे. 

बटवा काढला, अडकित्त्यात घालून सुपारी कातरली, चुना लावला, कात टाकला की झाले पान... ही गावाकडची पद्धत. चोखंदळ ग्राहक शौकिनांसाठी मात्र पानाचे तब्बल चारशेहून अधिक प्रकार आहेत. त्यात काही तंबाखूयुक्त आहेत तर काही बिगरतंबाखूचे. अगदी चॉकलेट पान, आईस्क्रीम पानासह मधुचंद्राच्या रात्रीसाठीच्या खास पानांचा समावेश आहे. हे सारे विडे बनतात ते कलकत्ता पानात. तळहाताएवढे मोठेच्या मोठे पान, थोडे जाडसर आणि चवीला एकदम भन्नाट. ते असेल तरच मसाले पानाला रंगत येते आणि चमन चटणी तिखट लागते. चॉकलेट पानात लज्जत चॉकलेटची जास्त असली तरी पान कुठले आहे यावर रंगत ठरते. 


आता लॉकडाऊन काळात पानांची आवक पूर्ण थांबली आहे. पश्‍चिम बंगालमधून कलकत्ता पानांची आवक पूर्ण थांबलेली आहे. अगदी अपवादानेच काही पान येत आहेत. कोरोना संकटाच्या आधी दोन रुपयांना एक म्हणजे दोनशे रुपये शेडका दराने हे पान मिळायचे. आता काही ठिकाणीच पान उपलब्ध असून तब्बल सहाशे रुपये शेकडा दर सुरु आहे. सहाजिकच, हे पान घेऊन त्याचा विडा विकणे परवडणारे नाहीत. त्यामुळे स्थानिक पानांचा विडा करण्यावर भर आहे. काही पानपट्ट्यांनी तर पान विक्री बंदच ठेवली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT