1suspend_4
1suspend_4 
पश्चिम महाराष्ट्र

पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस निलंबित 

सकाळवृत्तसेवा

कडेगाव (सांगली) : स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन करतो, अशी बतावणी करून तरुणीवर बलात्कार केलेनंतर फरार असलेला कडेगाव पोलिस ठाण्याचा निरीक्षक विपीन हसबनिस याला निलंबित केले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी ही निलंबनाची कारवाई केली. 

माझी पत्नी तुला एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन करेल, अशी बतावणी करुन हसबनिस याने संबंधित तरुणीला कडेगाव येथील राहते बंगल्यात घेऊन जावून तिचेवर अत्याचार केला. अशी फिर्याद पीडितेने हसबनिस याच्या विरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात दिली होती.त्यानंतर हसबनिस याच्या विरुद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर हसबनिस हा फरार झाला होता. तर पोलिसांकडून त्याला अटक व निलंबनाची कारवाई न झाल्यामुळे अनेक संघटनांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे याबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना पाठवला होता. त्यानंतर विपीन हसबनीस याला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी सेवेतून निलंबित केले. 

तर सदर गुन्हयाचा तपास उपाधीक्षक कृष्णात पिंगळे हे करीत असून सदर गुन्हयाचे तपासामध्ये घटनास्थळ पंचनामा , महत्त्वाचे साक्षीदार यांचे जाबजबाब घेणेत आलेले आहेत. तसेच फिर्यादीचा न्यायालयासमोर जबाब नोंदविणेत आलेला आहे. गुन्हयाचे अनुषंगाने महत्वाचे पुरावे हस्तगत करणेत आलेले आहेत. 

सदर गुन्ह्यातील संशयित विपीन हसबनीस याचा शोध सुरु आहे. पोलिस अधीक्षक शर्मा व अपर अधीक्षक मनिषा दुबुले यांचे मार्गदर्शानाखाली या गुन्हयातील आरोपीचे शोधासाठी इस्लामपूर येथील व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अशी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. घरी, नातेवाईकांचे घरी व मिळून येणेचे संभाव्य ठिकाणी शोध मोहिम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT