पश्चिम महाराष्ट्र

मी लवकरच सत्तेत येणार - सुशीलकुमार

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - ""सध्या मी सत्तेत नसलो तरी, लवकरच सत्तेत येणार आहे'', अशी भविष्यवाणी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते ब्रिजमोहन फोफलिया यांच्या सन्मानासाठी आयोजिलेल्या कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते.  आमदार प्रणिती शिंदे, इंदरमल जैन, गोपाल खंडेलवाल, चंद्रकांत तापडिया, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले,""आज माझ्याकडे सत्ता नाही, मात्र येणार आहे. त्यावेळी निश्‍चितच फोफलिया यांच्या कार्याचा गौरव केला जाईल. देश सत्याची, ज्ञानाची, सौंदर्याची आणि कलेची पूजा करतो. संस्कृतीचा टिकाव करण्याची वृत्ती असणारी माणसेच जीवनात पुढे जातात''.

""मारवाडी समाजाबद्दल आपणास खूप आदर आहे. मारवाडी व जैन समाजाच्या सामाजिक कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न केला. आपण कधीसुद्धा मारवाडी समाजाबद्दल चुकीचे बोलणार नाही. नागपूर येथील कार्यक्रमात जे बोललो नाही ते संबंधिताने मोडून तोडून माध्यमांसमोर आणून वाक्‍याचा विपर्यास करून आपल्याबद्दल मारवाडी समाजात गैरसमज पसरवला. मात्र आज मारवाडी समाजाने आपणास बोलावल्याने आणि त्याबाबतचा खुलासा झाल्याने समाजाने आपणास समजून घेतले आहे. विरोधक अशाच क्‍लुप्त्या शोधत असतात. आपण शाळा, इन्स्टिट्यूट, साखर कारखाना, दवाखाना उभारला नाही, मात्र लोकांना मदत करतो म्हणून आपण या क्षेत्रात बेडर आहे,'' असेही श्री. शिंदे म्हणाले. राजेंद्र कलंत्री यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महावीर शास्त्री यांनी सूत्रसंचालन केले. पुरुषोत्तम बलदवा यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT