raosaheb-danve
raosaheb-danve 
पश्चिम महाराष्ट्र

माझ्याकडून कशाला वदवून घेता? - दानवे

सकाळवृत्तसेवा

शिर्डी - ‘नवे प्रदेशाध्यक्ष कोण, हे माझ्याकडून कशाला वदवून घेतो भाऊ?’ अशा खास ढंगात, नूतन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नव्या भाजप प्रदेशाध्यक्षाच्या नावाबाबत कानावर हात ठेवले. आपल्या मतदारसंघात जाण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास दानवे यांचे दिल्लीहून विमानाने शिर्डी विमानतळावर आगमन झाले. त्या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधीने त्यांना गाठले. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असतील, असा प्रश्‍न विचारला. त्यांनी वरील प्रतिप्रश्‍न करून उत्तर देणे टाळले.  

केंद्रात राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. याबाबत ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी माझ्यावर जो विश्‍वास दाखविला, तो सार्थ ठरवीन. क्षमतेहून अधिक काम करून जनतेचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करीन.’’ विमानातून उतरल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताच्या सलामीवीरांची दणक्यात सुरुवात, 5 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या 60 धावा

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Update: दिवसभरात देशविदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT