charging station
charging station sakal media
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : चार्जिंग स्टेशन उभारल्यास मालमत्ता करात सूट

सकाळ वृत्तसेवा

सांगली : स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानातंर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात नागरीक, गृहनिर्माण संस्था यांनी इलेक्ट्रीक वाहनांकरीता चार्जिंग स्टेशन उभारल्यास त्यांच्या मालमत्ता करात सूट देण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

आयुक्त कापडणीस म्हणाले, स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानातंर्गत महापालिका क्षेत्रात विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांच्या तसेच विविध संघटनांचा हे सहभाग घेण्यात येत आहे. याबरोबरच आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास मालमत्ता करात सूट देण्याची ही योजना आणत आहोत. यामध्ये स्वत:च्या इलेक्ट्रीक वाहनाकरीता चार्जिंग स्टेशन उभारल्यास व त्यातून इतर इलेक्ट्रीक वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध केल्यास त्यांच्या मालमत्ता करात दोन टक्के सूट देण्यात येणार आहे.

तसेच गृहनिर्माण संस्थामध्ये सामाजिक सुविधांतर्गत सदस्यांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा उपलब्ध केल्यास मालमत्ता करात पाच टक्के सूट दिली जाणार आहे. गृहनिर्माण संस्थानी त्यांच्या मालकीच्या जागेत व्यापारी तत्वावर इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग सुविधा मोकळ्या जागेत केल्यास या जागेला व्यापारी दरावर कर आकारणी न करता घरगुती दराने कर आकारणी करण्यात येणार आहे. या सुविधेचा मनपाक्षेत्रातील सर्व नागरिक आणि गृहनिर्माण सोसायटी यांनी लाभ घेणेचे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT