Election
Election Sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली अर्बन, शिक्षक बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

सकाळ वृत्तसेवा

सांगली अर्बन बॅंक, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, विटा मर्चंटस्‌, एम. डी. पवार बँक, तासगाव अर्बनसह १६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज प्रसिद्ध झाला.

सांगली - सांगली अर्बन बॅंक, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, विटा मर्चंटस्‌, एम. डी. पवार बँक, तासगाव अर्बनसह १६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज प्रसिद्ध झाला. सांगली अर्बनसाठी २६ जूनला, शिक्षक बँक ३ जुलै रोजी, विटा मर्चंटस्‌साठी ३ जुलै, पवार बँकेसाठी २५ जूनला; तर तासगाव अर्बन बँकेसाठी २३ जूनला मतदान होईल. या संस्थासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सहकारी बँकांची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरू झाले आहे.

कोरोनाची साथ कमी झाल्याने सहकार प्राधिकरणाकडून लांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. चार महिन्यांपासून विकास सोसायट्यांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात सुरू आहेत. त्यांतर आता सहकारी बँका, खरेदी-विक्री संघ यांचे रणांगण कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंधरा दिवसांपूर्वी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार सहकार विभागाच्यावतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध केला. सोळा संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता आजपासून लागू झाली. सांगली अर्बन बँकेचे ६० हजार; तर शिक्षक बँकेची सभासद संख्या सव्वापाच हजार आहे. या दोन बॅंकांसाठी जोरदार लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

याशिवाय लोकमान्य सहकारी पतसंस्था, आष्टा, श्री दत्त सहकारी पतसंस्था, इस्लामपूर. सांगली जिल्हा पोलिस सोसायटी, सांगली, लठ्ठे शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, सांगली, पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था, सांगली. अहिल्यादेवी होळकर सहकारी पतसंस्था, पेड. सांगली जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्था, सांगली. सिम्बायोसिस फार्मास्युटिकल्स, दरिकोन्नर सोसायटी, दरिकोन्नर (ता. जत) व जत तालुक्यातील व्हसपेठ सोसायटीच्या निवडणुकीचा समावेश आहे.

अर्बन बॅंक गाडगीळ, पुजारींकडे नजर...

सांगली अर्बन बॅंकेसाठी यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते बापूसाहेब पुजारी यांच्याकडून गणेशराव गाडगीळ यांनी सत्ता मिळवली होती. यंदाच्या निवडणुकीतही पुजारी गटाचे प्रमोद पुजारी यांनी विद्यमान अध्यक्षांवर मनमानी पद्धतीने कारभाराची टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना बिनविरोधचे प्रयत्न असले, तरी विरोधकांकडे कसा प्रस्ताव जातोय, याकडे नजर आहे. सन्मानजनक तोडगा अन्यथा निवडणूक, अशी विरोधी गटाची भूमिका आहे.

शिक्षक बॅंकेत समिती की संघ...

शिक्षक बॅंकेत गेली दोन निवडणुकांमध्ये नेते विश्‍वनाथ मिरजकर, किरणराव गायकवाड, शशिकांत भागवत यांच्या नेतृत्वाखालील समितीची सत्ता आहे. यंदा तिसऱ्यांदा विजयासाठी त्यांनी तयारी केली आहे. विरोधीतील शिक्षक संघ (थोरात गट व शि. द. पाटील), यांच्यातील जागा वाटप आणि प्रचारातील ताळमेळ महत्त्वाचा असेल. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे सभासदावर दोन्ही गटांचे भवितव्य आहे. विरोधकांनी एकमताने निवडणूक लढली, तर समितीसमोर आव्हान निर्णाण होईल, असेच सध्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: झुंझार अर्धशतक करणारा ऋतुराज झाला क्लिन-बोल्ड, एमएस धोनीची मैदानात एन्ट्री

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT