prostitute
prostitute sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : वेश्‍यांच्या मानवी हक्कांचे आता रक्षण होईल ; किरण देशमुख

सकाळ वृत्तसेवा

सांगली: ‘वेश्‍या महिलांचे काम हा व्यवसाय आहे. त्याचा सन्मान करा, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळेच वेश्‍यांच्या मानवी हक्कांचे रक्षण होईल,’ असा विश्‍वास नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्सच्या अध्यक्षा श्रीमती किरण देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

देशातील आठ राज्यांत ही संघटना काम करत असून महिला, पुरुष आणि तृतीयपंथीय असे सुमारे दीड लाख सभासद आहेत. श्रीमती देशमुख म्हणाल्या, ‘‘वेश्‍या महिलांच्या हक्काची लढाई दीर्घकाळ सुरू आहे. आमच्याकडे माणूस म्हणून बघा, अशी हाक आम्ही नेहमीच देत आलो आहोत; परंतु हा समाज पूर्वग्रहदूषित पद्धतीने आमची हेटाळणी करत आला आहे. शासकीय यंत्रणा आणि पोलिसांकडून मिळणारी वागणूक माणूस म्हणून त्रासदायक होती. अशावेळी सर्वोच्च न्यायालयाने आमच्याबाबत जे निरीक्षण नोंदवले ते खूप महत्त्वाचे आणि आमच्या जगण्याला नवे बळ देणारे आहे.’’

त्या म्हणाल्या,‘‘वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या एखाद्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाले, तर पोलिस तिची दखल घेत नव्हते. ‘तू धंदा करते, मग लैंगिक अत्याचार कसले?’, असे विचारले जाई. आता तसे होणार नाही. तिच्या मर्जीने ती व्यवसाय करतेय, पण म्हणून तिच्यावर अत्याचाराचा हक्क कुणाला मिळत नाही. तसे झाल्यास पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला न्याय मिळवून द्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. पोलिसांच्या नाहक छापेमारीपासून आम्हाला संरक्षण मिळेल, अशीही अपेक्षा आहे. जर १८ वर्षांवरील कुणी व्यवसाय करत असेल, तर तिला सुधारगृहात पाठवण्याची आता सक्ती करता येणार नाही. संग्राम संस्था आणि वेश्‍या अन्याय मुक्ती परिषदेने ही लढाई ताकदीने लढली. त्यासाठी संस्थेच्या प्रमुख मीना शेषू, आरती पै, शशिकांत माने, राजू नाईक आदींनी पाठीशी ताकद उभी केली.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT