Chandoli Dam esakal
पश्चिम महाराष्ट्र

Chandoli Dam : चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार, चारही दरवाजे खुले; वारणा, कृष्णेच्या पातळीत होणार वाढ!

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम

सकाळ डिजिटल टीम

सांगली शहर व जिल्ह्यात काल दिवसभर पावसाने मुक्काम ठोकला. थांबून थांबून हलक्या व मध्यम सरी कोसळत राहिल्या. त्यामुळे बाजारपेठेसह सगळीकडेच तारांबळ उडाली.

सांगली / वारणावती : चांदोली धरण (Chandoli Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळं काल दुपारी धरणाचे उर्वरित दोन्ही दरवाजे खुले केले असून, सध्या धरणाच्या चारीही दरवाजातून वारणा नदी (Warna River) पात्रात विसर्ग सुरू केला आहे.

सांगली शहर व जिल्ह्यात काल दिवसभर पावसाने मुक्काम ठोकला. थांबून थांबून हलक्या व मध्यम सरी कोसळत राहिल्या. त्यामुळे बाजारपेठेसह सगळीकडेच तारांबळ उडाली. कृष्णा नदीच्या (Krishna River) पातळीत कोणतीही वाढ झाली नाही, मात्र कोयना धरणातून काल सायंकाळी विसर्ग वाढविण्यात आला असून तो १०५० वरून २१०० क्युसेक केला आहे.

कोयनेतून कर्नाटकने आलमट्टी धरणातील साठ्यातील वेगवान वाढ लक्षात घेऊन कालपासून विसर्ग वाढवण्यास सुरुवात केली होती. काल दुपारपासून तो १ लाख ७५ हजार क्युसेक केला. या पावसाळ्यात आज सर्वाधिक पाऊस झाला. त्यामुळे सांगली शहरात सगळीकडे लोकांची तारांबळ उडालेली दिसली.

आलमट्टीतून विसर्ग दीड लाखावर

बेळगाव : आलमट्टी धरणातून गुरुवारी (ता. २७) सायंकाळी ६.३० वाजता १ लाख ७५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात ८९.८०० टीएमसी पाणी साठा झाला असून, आवक १ लाख ६५ हजार ८३३ क्युसेक इतकी आहे. धरण ७२.९६ टक्के भरले आहे. विसर्ग वाढविल्यामुळे कोल्हापूर, सांगलीला तूर्तास दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT